Kalyan Crime : मोठी अपडेट, विशाल गवळी गुन्हा करायचा, तुरूंगातून परत बाहेर यायचा, त्या गोष्टीमुळे मिळायचा जामीन?; परत सुटणार ?
खाऊ घेण्यासाठी बाहेर पडलेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करून निर्घृणपणे तिची हत्या करणारा आरोपी विशाल गवळी आणि त्याला यात साध देणार पत्नी साक्षी या दोघांना न्यायालयाने 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
खाऊ घेण्यासाठी बाहेर पडलेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करून निर्घृणपणे तिची हत्या करणारा आरोपी विशाल गवळी आणि त्याला यात साध देणार पत्नी साक्षी या दोघांना न्यायालयाने 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. हा लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणात नवनवे अपडेट्स समोर येत असून आता आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आरोपी विशाल गवळीवर याच्याआधीही अनेक गु्न्हे दाखल करण्यात आले असून त्याने त्यासाठी तुरूंगाची हवाही खाल्ली आहे. मात्र सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे गुन्हे करून तो तुरूंगात जायचा पण परत बाहेर यायचा. रिपोर्ट्सनुसार, विशा गवळी याच्याकडे मानसिक रुग्ण असल्याचा दाखला असून तो दाखवून त्याच्याआधारेच तो जामीनावर बाहेर यायचा.
मनोरुग्ण असल्याचा दाखला दाखवून गवळी याने आत्तापर्यंत दोन वेळा जामीन घेतल्याची माहिती समोर आली आहे. हा दाखला त्याला कोणी दिला आणि त्याने तो कसा मिळवला याबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. आणखी धक्कादायक गोष्ट म्हणजे विशाल गवळी याच्यासह आणखी चार त पाच आरोपींकडेसुद्धा अशाच प्रकारचा दाखला असल्याचेही समोर आले आहे. पोलीसांकडून याप्रकरणी तपास सुरू आहे.
2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी
दरम्यान, अल्पवयीन मुलीवर अत्याचार व तिची हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावणारा विशाल गवळी आणि गुन्ह्यात त्याची साथ देणारी पत्नी साक्षी हिला आज कोर्टात हजर करण्यात आलं होतं. कोर्टाने दोघांनाही 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. न्यायाधीश व्ही. ए. पत्रावळे यांच्यासमोर ही सुनावणी होत असतानाच सरकारी वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. आरोपीने अल्पवयीन मुलीचं अपहरण कुठून केलं? तिची हत्या कशी झाली? तिला कशा प्रकारे मारलं? त्याला या प्रकरणात मदत करणारे आणखी कोणी आहेत का? त्याने हत्या करण्यासाठी कोणतं साहित्य वापरलं? मृतदेहाची विल्हेवाट कुठे लावली? या सर्वांचा तपास करायचा असल्याने त्याची पोलीस कोठडी द्यावी, असी मागणी सरकारी वकिलांनी केली होती. त्यानुसार कोर्टाने ही कोठडी सुनावली आहे.
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी घेतली पीडित कुटुंबाची भेट
भाजप नेत्या चित्रा वाघ कल्याण मध्ये दाखल झाल्या. कल्याण पूर्वेतील आमदार सुलभा गायकवाड यांची कार्यालयात भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर चित्रा वाघ पीडित कुटुंब यांच्या घरी भेटण्यास निघाल्या. दोन दिवसापूर्वी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या झाली होती. या मुलीच्या कुटुंबाची भेट घेतल्यानंतर चित्रा वाघ स्थानिक पोलिस ठाण्यात गेल्या आणि पोलिसांकडून केस संदर्भात माहिती जाणून घेतली.
ही माणुसकीला काळिमा फासणारी आणि अतिशय संतापजनक घटना आहे. या घटनेतीला नराधमाला फाशीचीच शिक्षा होणार. शक्य असतं तर त्या नराधमाचा चौरंगा केला असता पण ते शक्य नाही.अशा विकृत लांडग्यांना ठेचून काढण्याची गरज असल्याचं मतं चित्रा वाघ यांनी व्यक्त केलं.