गावी चोरी करतो म्हणून उत्तर प्रदेशातून मुंबईला आणले, त्याने थेट… वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली

एका गुन्हेगाराला त्याचं आयुष्य सुधारण्याची, पुन्हा नव्याने सुरूवात करण्याची चांगली संधी मिळाली होती. मात्र त्याने स्वत:च्याच पायावर धोंडा पाडून घेत ही सुवर्णसंधी घालवली. आणि पुन्हा गुन्ह्यांच्या दलदलीमध्ये रुतण्यासाठी स्वत:हून पाऊल टाकले.

गावी चोरी करतो म्हणून उत्तर प्रदेशातून मुंबईला आणले, त्याने थेट... वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
Follow us
| Updated on: Jan 05, 2024 | 1:42 PM

सुनील जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, कल्याण | 5 जानेवारी 2024 : जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही… अशी एक म्हण आहे. ही म्हण अगदी शब्दश: खरी करून दाखवणारा प्रकार कल्याण मध्ये घडला. तेथे एका गुन्हेगाराला त्याचं आयुष्य सुधारण्याची, पुन्हा नव्याने सुरूवात करण्याची चांगली संधी मिळाली होती. मात्र त्याने स्वत:च्याच पायावर धोंडा पाडून घेत ही सुवर्णसंधी घालवली. आणि पुन्हा गुन्ह्यांच्या दलदलीमध्ये रुतण्यासाठी स्वत:हूनच पाऊल टाकले. कल्याण पूर्वेला हा प्रकार घडलाय.

गावाला चोरी करतो, म्हणून त्याला सुधारण्यासाठी त्या चोराच्या वडिलांनी त्याला मुंबईत आणलं. पदरचे पैसे खर्च करून पाणीपुरीची गाडीही टाकून दिली. पण ये रे माझ्या मागल्या… अशीच गत त्या चोराची झाली. जेमतेम महिनाभर पाणीपुरीचा व्यवसाय करून त्याने पुन्हा चोरीचाच मार्ग पत्करला आणि कुटुंबाचे सगळे प्रयत्न व्यर्थ गेले. झटपट पैसे कमावण्याच्या नादात त्या चोराने चक्क देवांनाही सोडलं नाही. त्याने थेट मंदिरातील दानपेटीवर डल्ला मारला. पण तेथील सीसीटीव्ही फुटेज आणि खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळत अटक केली.

नक्की काय झालं ? कसा गावला चोर ?

कल्याण पूर्वेकडे करपेवाडी परिसरात एका मंदिरातील दानपेटी चोरीला गेल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. देवानांही न सोडणारा, दानपेटीवर डल्ला मारणारा हा चोरटा देवळातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला होता. कोळसेवाडी पोलिसांनी त्याची ओळख पटवत त्या चोरट्याला बेड्या ठोकल्या. आशिष मोरया असे त्या चोराचं नाव आहे. तो एक सराईत चोर असून मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे.

सुधारण्यासाठी वडिलांनी मुंबईत आणलं पण..

त्याच्या विरोधात उत्तर प्रदेश मधील विविध पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत. आपला मुलगा सुधारावा, चोरीचा हा बुरा मार्ग त्याने सोडावा यासाठी त्याच्या कुटुंबियांनी , वडिलांनी प्रयत्नांची शर्थ केली. वडील त्याला उत्तर प्रदेशातून मुंबईत घेऊन आले. पदरचे पैसे खर्च करून त्यांनी आशिषला पाणीपुरीची गाडीही टाकून दिली. मात्र कुटूंबाचे प्रयत्न व्यर्थचं ठरले. आशिषने जेमतेम महिनाभर पाणीपुरीचा व्यवसाय केला. पण नंतर त्याने पुन्हा त्याने चोरीचाच मार्ग पत्करला.

विशेष म्हणजे देवळात चोरी करण्यासाठी त्याने आधी एक सायकल चोरली. नंतर त्याच सायकलवरून मंदिर परिसराची पहाणी केली. अखेर रात्रीच्या वेळी मंदिरात शिरून तो मंदिरातील दानपेटी उडवायचा. कल्याण पूर्वेकडील करपेवाडी परिसरात असलेल्या एका मंदिरातील दानपेटीही त्याने अशीच चोरली. मात्र तेथे लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीत तो कैद झाला. त्यानंतर कल्याण कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी रविराज मदने यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या मदतीने आशिष या चोरट्याला बेड्या ठोकल्या. झटपट पैसा कमावण्याच्या हव्यासापोटी त्याने चोरीचा मार्ग निवडल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीचा माल जप्त केला असून पुढील तपास सुरू केला.

Non Stop LIVE Update
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर....
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर.....
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?.
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्.
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार.
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं.
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य.
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप.
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट.
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?.
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?.