Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

kalyan Crime : एक डुलकी पडू शकते महागात, कल्याण स्थानकात मोबाईल चोरांचा सुळसुळाट

कल्याण स्थानक परिसरात मोबाईल चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. लोकसपासून लांबपल्ल्याच्या गाड्या या स्थानकातून सुटतात. यामुळे स्थानकातील गर्दीचा फायदा घेत चोरटे संधी साधतात.

kalyan Crime : एक डुलकी पडू शकते महागात, कल्याण स्थानकात मोबाईल चोरांचा सुळसुळाट
कल्याणमध्ये मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीला अटकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 28, 2023 | 3:23 PM

कल्याण / 28 जुलै 2023 : कल्याण रेल्वे स्टेशन हे मध्य रेल्वेवरील एक महत्वाचे स्टेशन आहे. लांब पल्ल्याच्या गाड्याही या ठिकाणाहून सुटत असल्याने स्टेशन परिसर कायमच गजबजलेला असतो. सध्या पावसाचे दिवस असल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रकही वारंवार कोलमडत आहेत तर दुसरीकडे लांब पल्ल्याच्या गाड्यांचेही वेळापत्रक बिघडले आहे. काही गाड्या रद्द होत आहे तर काही तासनतास उशिराने धावत आहेत. यामुळे प्रवासी आराम करण्यासाठी स्टेशन परिसरात एखादी जागा बघतात आणि झोपून घेतात. मात्र एक डुलकी काही प्रवाशांना महागात पडली आहे. झोपेत असलेल्या प्रवाशांना लुटल्याची घटना घडली आहे. तर धावत्या लोकलमध्येही झोपेत असणाऱ्या प्रवाशांचे मोबाईल चोरी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. कल्याण रेल्वे पोलिसांनी तिघांना बेड्या ठोकल्या आहेत.

रेल्वे पोलिसांनी तिघांना ठोकल्या बेड्या

लोकलमध्ये किंवा प्लॅटफॉर्मवर झोपेत असलेल्या प्रवाशांचे मोबाईल, रोकड लंपास करत पसार होणाऱ्या तिघांना कल्याण रेल्वे पोलिसांनी तीन विविध ठिकाणाहून अटक केली. संतोष चव्हाण, शफिक खान, अनिल सहाणे अशी या तिघांची नावे आहेत. या तिघांच्या विरोधात याआधी देखील अशा प्रकारचे गुन्हे दाखल असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे. कल्याण रेल्वे स्थानकावर तसेच धावत्या लोकलमध्ये झोपेत असलेल्या प्रवाशांचे मोबाईल, रोकड चोरी होत असल्याच्या घटना वारंवार घडत होत्या.

वारंवार येणाऱ्या तक्रारींनंतर पोलीस अॅक्शन मोडमध्ये

कल्याण रेल्वे पोलिसांनी अॅक्शन मोडमध्ये येत या चोरट्यांचा शोध सुरु केला. कल्याण बुकिंग कार्यालयाजवळ झोपेत असलेल्या एका प्रवाशाचा मोबाईल चोरीला गेला होता. या प्रवाशाने कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार नोंदवली. या घटनेचा तपास करताना पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. पोलीस आरोपींची कसून चौकशी करत आहेत.

हे सुद्धा वाचा

'या' राजकीय पक्षाला मोठा धक्का, माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार
'या' राजकीय पक्षाला मोठा धक्का, माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार.
'...तो पुरूष नाहीच', सुळेंची मुंडेंवर जहरी टीका अन् केला खळबळजनक दावा
'...तो पुरूष नाहीच', सुळेंची मुंडेंवर जहरी टीका अन् केला खळबळजनक दावा.
मुख्यमंत्र्यांनी सांगितली नागपूर घटनेची A to Z स्टोरी
मुख्यमंत्र्यांनी सांगितली नागपूर घटनेची A to Z स्टोरी.
विधानभवनात पत्रकारांना धक्काबुक्की, माध्यमांच्या प्रतिनिधींचंच आंदोलन
विधानभवनात पत्रकारांना धक्काबुक्की, माध्यमांच्या प्रतिनिधींचंच आंदोलन.
'अजितदादा... जरा जमिनीवर या', करूणा शर्मांनी अजित पवारांना फटकारलं
'अजितदादा... जरा जमिनीवर या', करूणा शर्मांनी अजित पवारांना फटकारलं.
हल्ले करणारे चेहरे ओळखीचेच; नागपूर प्रकरणावर राऊतांचा गंभीर आरोप
हल्ले करणारे चेहरे ओळखीचेच; नागपूर प्रकरणावर राऊतांचा गंभीर आरोप.
'सत्तेतील एक मंत्री वळवळ करतोय', नागपुरातील रड्यावरून वडेट्टीवार भडकले
'सत्तेतील एक मंत्री वळवळ करतोय', नागपुरातील रड्यावरून वडेट्टीवार भडकले.
विधानभवना बाहेर सत्ताधारी-विरोधक आमनेसामने
विधानभवना बाहेर सत्ताधारी-विरोधक आमनेसामने.
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील टोल महागणार, आता किती भरावा लागणार टोल?
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील टोल महागणार, आता किती भरावा लागणार टोल?.
नागपुरातील राड्यानंतर मुख्यमंत्र्यांचे एकच आवाहन; 'सर्वांनी...'
नागपुरातील राड्यानंतर मुख्यमंत्र्यांचे एकच आवाहन; 'सर्वांनी...'.