तिच्या ओठांचे निशाण त्याच्या गालावर, 37 दिवसांचा तपास आणि WhatsApp चॅट! रोनिल हत्याकांडाचा उलगडा
जेव्हा प्रियकर बहीण भावाच्या नात्याचा भलताच अर्थ काढतो तेव्हा काय होतं? रोनिल हत्याकांडप्रकरणी खळबळजनक खुलासा
कानपूर : रोनिल हत्याकांड प्रकरणी अखेर कानपूर पोलिसांनी मोठा खुलासा केलाय. 36 दिवसांच्या तपासानंतर या हत्याकांड प्रकरणी खळबळजनक माहिती समोर आलीय. कोचिंग क्लासमध्ये शिकणाऱ्या रोनिलच्या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं आहे. कोचिंग क्लासमध्ये ज्या मुलीला रोनिल आपली बहीण मानत होता, त्या मुलीच्या प्रियकरानेच संशयातून रोनिलची हत्या केली.
रोनिल आणि त्याच्या प्रेयसीचे असलेल्या बहीण-भावाच्या नात्याचा भलताच अर्थ काढत या मुलीच्या प्रियकराने रोमिलची गळा आवळून हत्या केली. या प्रकरणी विकास नावाच्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. विकास हा आयटीआयचा विद्यार्थी होता.
विकासची खरंतर आधीही पोलिसांनी चौकशी केली होती. पण पोलिसांना सुगावा लागू नये, यासाठी सराईतपणे आपण जणू काही केलंच नाही, असा साळसूदपणाचा आव आणला होता. पण व्हॉट्सअप चॅटने अनेक गोष्टींचा उलगडा केलाय.
रोनिल ज्या कोचिंग क्लासमध्ये शिकत होता, त्याच कोचिंग क्लासमध्ये एक मुलगी होती. रोमिल या मुलीला आपली बहीण मानत होता. पण या मुलीचा प्रियकर असलेल्या विकास यादव नावाच्या मुलीला रोमिलचं त्याच्या प्रेयसीसोबत असलेलं नातं आणि त्यांची एकमेकांशी असलेली जवळीक खुपत होती.
रोनिल हा दहावीचा विद्यार्थी. तो 31 ऑक्टोबर रोजी शाळेतून निघाला. पण घरी परतलाच नाही. 1 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी एका झाडाखाली त्याचा मृतदेह सापडला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला.
रोनिलच्या हत्येप्रकरणी काहीच छडा लागत नसल्यानं पोलिसांना प्रचंड रोषालाही सामोरं जावं लागत होतं. दरम्यान, पोलिसांनी 37 दिवसांत 36 विद्यार्थ्यांची चौकशी केली. त्यात विकास यादव याचाही समावेश होता. पण अखेर काहीच सुगावा हाती लागत नसल्यानं पोलिसांनी अखेर सायबर एक्स्पर्ट टीमची मदत घेतली. त्यासाठी खास बंगळुरुवरुन सायबर एक्स्पर्ट बोलावण्यात आले.
रोनिलच्या मोबाईलमधील चॅटिंग तपासण्यात आलं. त्यातून पोलिसांना मोठी माहिती हाती लागली. रोनिल ज्या मुलीला आपली बहीण मानत होता, त्या मुलीच्या प्रियकरानेच रोनिलही हत्या केली होती.
रोनिल याला समज देण्यासाठी विकास याने त्याला एकेठिकाणी भेटायला बोलावलं होतं. दोघांमधील संभाषणावेळी रोनिल याने खिशातून एक फोटो काढला. या फोटोमध्ये रोनिल याच्या चेहऱ्यावर लिपस्टिकमुळे गालांवर उमटलेले मुका घेतल्याचे निशाण दिसून आले. हे पाहून विकासच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्याने रोनिल याला खाली पाडलं आणि गळा आवळून त्याची हत्या केली.
रोनिलचा हत्या आयटीआय शिकणाऱ्या विकासने केली असेल, अशी शंका याआधी पोलिसांना चौकशीदरम्यान आली नव्हती. पण आता संपूर्ण सत्य समोर आलं होतं. अखेर पोलिसांनी विकास याला ताब्यात घेतलं. त्याला अटकही करण्यात आली आहे. दुसरीकडे रोनिल याच्या आईवडिलांना मुलाच्या हत्येमुळे मोठा धक्का बसला आहे. व्हॉट्सअप चॅटमुळे पोलिसांना या हत्याकांड प्रकरणी छडा लावण्यात मोठं यश मिळालं.