सख्ख्या आईच्या संमतीने 15 वर्षांच्या मुलीवर गँगरेप, 32 जणांना अटक

संबंधित महिला सुरुवातील पीडितेची मावशी असल्याचं सांगत होती. परंतु ती सख्खी आई असल्याचं समजल्यानंतर पोलिसही हैराण झाले. (Chikkamagaluru Gang Rape Mother Daughter)

सख्ख्या आईच्या संमतीने 15 वर्षांच्या मुलीवर गँगरेप, 32 जणांना अटक
कर्नाटकात सख्ख्या आईच्या संमतीने मुलीवर सामूहिक बलात्कार
Follow us
| Updated on: Mar 25, 2021 | 7:57 AM

बंगळुरु : 15 वर्षांच्या पोटच्या मुलीवर आईनेच सामूहिक बलात्कार घडवून आणल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. कर्नाटकातील चिक्कमंगळुरुमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे समाजमन सुन्न झालं आहे. जवळपास 30 जणांनी पीडितेवर अत्याचार केल्याची भीती आहे. मुलीची मावशीच या प्रकरणात मुख्य आरोपी असल्याचं फेब्रुवारी महिन्यात समोर आलं होतं, परंतु आरोपी महिला पीडितेची सख्खी आई असल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली. (Karnataka Chikkamagaluru Gang Rape Mother allegedly encouraged assault of Daughter)

कर्नाटकातील श्रीनगेरी तालुक्यातील एका गावात राहणारी महिला वेश्या व्यवसाय चालवत होती. जानेवारी महिन्याच्या अखेरीस पोलिसांना या रॅकेटविषयी माहिती मिळाली होती. पोलिसांनी आतापर्यंत 32 जणांना अटक केली आहे. संबंधित महिला सुरुवातील पीडितेची मावशी असल्याचं सांगत होती. परंतु ती सख्खी आई असल्याचं समजल्यानंतर पोलिसही हैराण झाले.

पहिल्या पतीपासून मुलगी

उत्तर कर्नाटकात राहणाऱ्या आरोपी महिलेचं पहिलं लग्न झालं होतं. तिने एका मुलीला जन्म दिला. मात्र पहिल्या नवऱ्यासोबत फिस्कटल्यानंतर श्रीनगेरी तालुक्यातील एका पुरुषाशी तिने लगीनगाठ बांधली. त्यानंतर तिने आपल्या मुलीला सासरी आणलं. परंतु ही आपली भाची असल्याचं दुसऱ्या नवऱ्याला खोटंच सांगितलं.

काही दिवसांनंतर दुसऱ्या पतीसोबतही महिलेचे संबंध बिघडले. नवरा दुसरीकडे राहायला गेल्यामुळे तिच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उद्भवला. मात्र तिने वाममार्गाने पैसे कमवण्याचा पर्याय निवडला. त्यासाठी तिने पोटच्या मुलीलाच वेश्या व्यवसायात ढकलले.

बालकल्याण समितीच्या सभापतींची तक्रार

1 सप्टेंबर 2020 ते 27 जानेवारी 2021 या पाच महिन्यांच्या कालावधीत तीसपेक्षा जास्त वेळा 15 वर्षांच्या अल्पवयीन तरुणीवर बलात्कार झाल्याचा आरोप आहे. एकाच रात्री तीनपेक्षा अधिक जणांनीही तिच्यावर बलात्कार केला.

कर्नाटकातील चिकमंगळुरु जिल्हा बालकल्याण समितीच्या सभापतींनी 30 जानेवारीला 17 जणांविरोधात बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या प्रकरणात हलगर्जी बाळगणारे श्रीनगेरी पोलीस सर्कलच्या निरीक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली, तर सहाय्यक पोलीस निरीक्षकाची बदली करण्यात आली. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी नवीन पथक स्थापन करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या :

मुलगी अल्पवयीन, 17 जणांचा बलात्कार, एका फोटोपासून अत्याचार सुरु

(Karnataka Chikkamagaluru Gang Rape Mother allegedly encouraged assault of Daughter)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.