AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dating App वर नर्सशी ओळख, भेटायला बोलवून चौघा स्विमर्सकडून गँगरेप

पीडितेने पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर गेल्या आठवड्यात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. रजतने आपल्याला न्यू बेल रोडवरील एका हॉटेलच्या रुममध्ये भेटायला बोलावलं होतं, असा दावा पीडितेने तक्रारीत केला आहे.

Dating App वर नर्सशी ओळख, भेटायला बोलवून चौघा स्विमर्सकडून गँगरेप
प्रातिनिधीक फोटोImage Credit source: Tv9
| Updated on: Mar 30, 2022 | 1:44 PM
Share

बंगळुरु : डेटिंग अॅपवर (Dating App) झालेली ओळख तरुणीला चांगलीच महागात पडली. कर्नाटकातील नर्सवर चौघा जणांनी सामूहिक बलात्कार (Gang Rape) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बंगळुरु (Bangalore) पोलिसांनी चार आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. चौघंही आरोपी दिल्लीतील व्यावसायिक जलतरणपटू अर्थात स्विमर्स असल्याची माहिती आहे. ट्रेनिंगसाठी ते बंगळुरुला आले होते. 22 वर्षीय आरोपी रजतची गेल्या आठवड्यात पीडितेशी एका डेटिंग अॅपवर ओळख झाली होती. फोन नंबर एक्स्चेंज केल्यानंतर त्यांची मैत्री झाली.

पीडितेने पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर गेल्या आठवड्यात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. रजतने आपल्याला न्यू बेल रोडवरील एका हॉटेलच्या रुममध्ये भेटायला बोलावलं होतं, असा दावा पीडितेने तक्रारीत केला आहे.

काय आहे प्रकरण?

डिनरनंतर मी रजतसोबत त्याच्या रुमवर गेले. त्यावेळी तिथे त्याचे आणखी तीन मित्र आधीपासूनच बसले होते. त्यानंतर चौघांनी माझ्यावर आळीपाळीने बलात्कार केला, असा आरोपी पीडित नर्सने केला आहे.

चौघंही व्यावसायिक जलतरणपटू

संजयनगर पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पीडितेच्या वैद्यकीय अहवालात बलात्काराच्या आरोपांना पुष्टी मिळाली आहे. रजत, शिव राणा, योगेश कुमार आणि देव सरोही अशी आरोपींची नावं आहेत. चौघंही विशीच्या आसपासचे आहेत.

रजत आणि शिव राणा तीन महिन्यांपूर्वीच बंगळुरुला आले होते. ते एका भाड्याच्या घरात राहतात. तर देव आणि योगेश गेल्याच आठवड्यात तिथे पोहोचले. स्विमिंगच्या ट्रेनिंगसाठी सगळे जण बंगळुरुला गेले होते. चौघा आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

अश्लील व्हिडीओ शूट करुन प्रियकराकडूनच ब्लॅकमेल, अल्पवयीन मुलीवर सहा महिने तिघांचा गँगरेप

छत्तीसगडमध्ये 7 वर्षांच्या मुलीवर अल्पवयीन मुलांकडून सामूहिक बलात्कार, मोबाईलवरील व्हिडिओ पाहून केले कृत्य

पतीच्या बर्थडेनिमित्त हॉटेलात जेवायला, पुण्यात विवाहितेवर पाच जणांचा गँगरेप

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.