धारवाडमध्ये भीषण अपघातात 8 जण ठार, 6 गंभीर जखमी! लग्नकार्य उरकून परतताना काळाचा घाला

Dharwad Road Accident : लग्नकार्य उरकून कुटुंबीय परतत असताना हा अपघात झाला.

धारवाडमध्ये भीषण अपघातात 8 जण ठार, 6 गंभीर जखमी! लग्नकार्य उरकून परतताना काळाचा घाला
भीषण अपघातImage Credit source: विजय कर्नाटका
Follow us
| Updated on: May 21, 2022 | 10:16 AM

कर्नाटक : धारवाड तालुक्यात भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये सात जणांचा मृत्यू झालाय. तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. धारवाड तालुक्यातील बड गावाजवळ मध्यरात्री हा भीषण अपघात घजला. अपघातातील सर्व मृत हे बनकट्टी गावचे रहिवासी आहेच. लग्नकार्य उरकून कुटुंबीय परतत असताना हा अपघात झाला. अनन्या, हरीष, शिल्पा, नीलव, मधुश्री, महेश्वरय्य आणि शंभुलिंगम अशा अपघातातील मृतांची नावं आहेत. मनसुर-नागडी या मार्गावर हा भीषण अपघात झाला. क्रूझर चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा भीषण अपघात झाला. या अपघातात जखमी झालेल्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आल. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

एकाचा उपचारादरम्यान मृत्यू

क्रूझर झाडावर आदळून जोरदार फटका बसल्यानं गाडीतील सात जण जागीच ठार झाले होते. तर सहा जण गंभीर झाले आहेत. जखमींपैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. मृतांमधील सर्व जण हे मोराबा गावचे रहिवासी असल्याची माहिती मिळतेय. या अपघाताची एसपी कृष्णकांत यांनी पाणी केली. त्यानंतर धारवाडच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात या अपघातप्रकरणी गुन्हादेखील दाखल करण्यात आलाय.

अपघातातील मृतांची नावं पुढीलप्रमाणे

अनन्या (14) हरीश (13) शिल्पा (34 नीलव्वा (60) मधुश्री (20) महेश्वरैया (11) शंभुलिंगम (35) चन्नावा (45)

हे सुद्धा वाचा

पाहा व्हिडीओ : नाशकात भीषण अपघात

अपघातातील जखमींवर हुबळीच्या किम रुग्णालयात सध्या उचार सुरु आहेत. निगडी गावात लग्नकार्य आटोपून कुटुबींय माघारी परतत होते. त्यावेळी हा भीषण अपघात झाला. एकूण 13 जण यावेळी क्रूझरमधून प्रवास करत. मात्र प्रवासादरम्यान, दुपारच्या वेळी शुक्रवारी हा भीषण अपघात घडला. या अपघातातील क्रूझरने झाडावर मारलेली धडक इतकी भीषण होती की गाडीचा अक्षरशः चुराडा झाला.

या अपघातप्रकरणी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य केलंय. तसंच कलम 304 नुसार गुन्हा देखील नोंदवला आहे. पोलीस आता या अपघातप्रकरणी अधिक तपास करत आहेत. या अपघातानं लग्नकार्य असलेल्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळलाय.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.