चर्चवर भगवा फडकवला, तर मारुतीरायाचा फोटोही आत ठेवला! कर्नाटकातील घटनेनं खळबळ

Karnataka News : या संपूर्ण घटनेचं सीसीटीव्ही हाती मिळावं, यासाठी पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे

चर्चवर भगवा फडकवला, तर मारुतीरायाचा फोटोही आत ठेवला! कर्नाटकातील घटनेनं खळबळ
प्रातिनिधीक फोटोImage Credit source: IMDb
Follow us
| Updated on: May 06, 2022 | 10:39 AM

एकीकडे महाराष्ट्रात मशिदींवरचे (Loudspeaker Row) भोंगे विरुद्ध हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) हा विषय चर्चेत असताना आता कर्नाटकातून महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कर्नाटकच्या (Karnataka News) कदबामध्ये एका चर्चवर चक्क झेंडा फडकावण्यात आलाय. त्यामुळे नवा वाद उफाळून येण्याची शक्यताय. आजतकनं दिलेल्या वृत्तानुसार चर्चचा जीर्णोद्धार सुरु होता. त्या दरम्यान, काहींनी या चर्चवर भगवा झेंडा फकडवला. इतकंच काय तर चर्चच्या आतमध्ये मारुतीरायाचा फोटोही ठेवण्यात आला होता. यावेळी पोलिसांनी दारुच्या बाटल्याही आढळल्या आहेत. आता सीसीटीव्ही फुटेज मिळवण्याच्या दृष्टीनं पोलीस कामाला लागले आहेत. त्यानंतर आता संपूर्ण प्रकरणाचं सत्य काय, हे समोर येण्याची शक्यताय. मात्र या घटनेमुळे संताप व्यक्त केला जातोय. या घटनेप्रकरणी पोलिसांमध्ये तक्रारदेखील देण्यात आली आहे. त्यानतंर पोलिसांनी घटनास्थली धाव घेत चर्चवरील भगवा झेंडा हटवलाय. मात्र या संपूर्ण संवेधनशील घटनेनंतर पोलिसांसमोरची आव्हानं वाढली आहे. नेमका हा सघाल प्रकार कुणी केला, असा सवाल आता उपस्थित केला जातोय.

दारु पिऊन झेंडे फडकवले?

चर्चमध्ये सापडलेल्या दारुच्या बाटल्यांनंतर पोलिसांनी याप्रकरणी संशय व्यक्त केलाय. दारुच्य नशेत काही तळीरामांनी चर्चवर झेंडा फडवला असावा, असं सांगितलं जातंय. दरम्यान, चर्चवर भगवा झेंडा फडकावतानाचा एक व्हिडीओदेखील व्हायरल झालाय. या व्हिडीओमध्ये लोकं मल्याळममध्ये बोलत असल्याचं दिसून आलंय.

सीसीटीव्हीनंतर खुलासा..

या संपूर्ण घटनेचं सीसीटीव्ही हाती मिळावं, यासाठी पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनेच संपूर्ण घटनेचा खुलासा करता येणं शक्य आहे, असं म्हटलंय. हे कृत्य नेमकं कुणी केलं, याचा तपास पोलिसांकडून केला जातोय. याप्रकरणी अधिक चौकशी पोलिसांकडून केली जातेय. दरम्यान, दोषी आढळणाऱ्यांवर तातडीनं कारवाई केली जाईल, असं देखील पोलिसांनी म्हटलंय.

हे सुद्धा वाचा

प्रकरण संवेदनशील..

दरम्यान, हे संपूर्ण प्रकरण संवेदनशील असून पोलिसांनी याप्रकरणी खबरदारी बाळगली आहे. तातडीनं चर्चवरील झेंडा खाली उतरवण्यात पोलिसांना यश आलंय. तर दुसरीकडे दोषींना लवकराच लवकरच पडून त्यांना कठोरातली कठोर शिक्षा केली जावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

पाहा व्हिडीओ : राज्यातील महत्त्वाची बातमी

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.