Hindu target killing : मोठी बातमी! काश्मिरात हिंदू बँक मॅनेजरची गोळ्या झाडून हत्या करणाऱ्या अतिरेक्याचा एन्काऊंटरमध्ये खात्मा

Kashmir LeT Militants killed in Encounter : बुधवारी रात्री करण्यात आलेल्या चकमकीत अखेर एका अतिरेक्याला कंठस्नान घालण्यात आलं असल्याची माहिती जम्मू काश्मीर पोलिसांनी दिली आहे.

Hindu target killing : मोठी बातमी! काश्मिरात हिंदू बँक मॅनेजरची गोळ्या झाडून हत्या करणाऱ्या अतिरेक्याचा एन्काऊंटरमध्ये खात्मा
चकमकीत अतिरेक्याचा खात्मा...Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 15, 2022 | 10:04 AM

नवी दिल्ली : जम्मू काश्मिरात (Jammu Kashmir news) एका अतिरेक्यानं हिंदू बँक मॅनेजरची (Hindu Band manager killing) गोळ्या झाडून हत्या केली होती. या घटनेचे तीव्र पडसाद देशभर उमटले होते. त्यानंतर आता काश्मिरातल्या पोलिसांनी महत्त्वपूर्ण कारवाई केली असल्याची माहिती दिली आहे. एका एन्काऊंटरमध्ये बँक अतिरेक्याची हत्या करणाऱ्याचा खात्मा करण्यात आला आहे. एका चकमकीत या अतिरेक्याला (Kashmir LeT Militants) कंठस्नान घालण्यात आलं असल्याची माहिती काश्मीर पोलिसांनी दिली आहे. एकूण दोन अतिरेकी हिंदू बँक मॅनेजरच्या हत्येला जबाबदार होते. हिंदू बँक मॅनेजरची हत्या केल्यानंतर संपूर्ण काश्मिरातील हिंदूंमध्ये दहशतीचं वातावरण होतं. अखेर आता लष्कर ए तोयबाशी संबंधित असलेल्या दोघांपैकी एका अतिरेक्याचा खात्मा करण्यात आलाय.

2 जून रोजी बँक मॅनेजरची हत्या

2 जून रोजी सकाळीच काश्मिरातील एक बँकेमध्ये घुसून बँक अधिकाऱ्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. हा बँक मॅनजर मूळचा राज्यस्थानातील राहणारा असून त्याचं नाव विजय कुमार होतं. हत्येच्या या घटनेचं सीसीटीव्ही देखील समोर आलेलं होतं.

हे सुद्धा वाचा

विजयच्या हत्येनंतर काश्मिरात प्रचंड दहशत माजली होती. कारण हिंदू बँक मॅनेजरच्या हत्येआधी एका शिक्षिकेची शाळेत घुसून हत्या करण्यात आलेली. त्यामुळे हिंदूच्या टार्गेट किलिंगचा मुद्दा उपस्थित केला जात होता.

बुधवारी एन्काऊंटर

बुधवारी रात्री करण्यात आलेल्या चकमकीत अखेर एका अतिरेक्याला कंठस्नान घालण्यात आलं असल्याची माहिती जम्मू काश्मीर पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, खात्मा करण्यात आलेल्या अतिरेक्याचं नाव जान मोहम्मद लोन असं असून तो शोपियानचा होता. विजय कुमारच्या हत्येमध्ये त्याचा हात होता, अशीही माहिती पुढे आलीय. काश्मिरची आयजीपींनी ही माहिती दिली आहे. गुरुवारी पहाटेच्या सुमारास ही माहिती काश्मिर पोलिसांच्या अधिकृत ट्वीटर हॅन्डलवर देण्यात आलीय.

हिंदूंच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

हिंदूंवर केल्या जाणाऱ्या टार्गेट किलिंगचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर काश्मिरातील अनेक हिंदूंनी स्थलांतर केलंय. प्रचंड दहशतीत असलेल्या हिंदू नागरिकांनी काश्मीस रोडण्याचा निर्णय घेतला होता.

गेल्या वर्षभरापासून काश्मिरात पुन्हा एकदा अतिरेक्यांकडून हिंदूना टार्गेट केलं जात असल्याचं दिसून आलं होतं. हिंदूमध्ये दहशत पसरवण्यासाठी केल्या जाणाऱ्या हत्येच्या सत्रामुळे एकच खळबळ उडालेली होती. यानंतर जम्मू काश्मिरात आंदोलनंही करण्यात आलेली.

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.