बॉयफ्रेंडला हॉटेलमध्ये बोलावलं, त्याने रुम बुक केली, तिथे गेल्यावर गर्लफ्रेंडने असा धक्का दिला की….
युवतीने त्याला सांगितलेलं की, तिला त्याच्यासोबत हॉटेलमध्ये वेळ घालवायचा आहे. युवक कुठलाही मागचा पुढचा विचार न करता पानीपतच्या हॉटेलमध्ये पोहोचला. युवकाने हॉटेलमध्ये रुम बुक केली. पुढे काय होणार? याची त्याला अजिबात कल्पना नव्हती.

प्रेमात विश्वास हा नात्याचा पाया असतो. त्यावर नात उभं राहतं. एका युवतीने डेहराडूनला राहणाऱ्या मुलाबरोबर मैत्री केली. सोशल मीडियावरुन हे प्रेमसंबंध बहरले. दोघांनी फोन नंबर एक्सचेंज केले. दोघांमध्ये अफेयर सुरु झालं. युवक त्या युवतीच्या प्रेमात इतका बुडाला की, तिच्या सांगण्यावरुन तो तिला भेटण्यासाठी पानिपतला जाऊन पोहोचला. युवतीने त्याला सांगितलेलं की, तिला त्याच्यासोबत हॉटेलमध्ये वेळ घालवायचा आहे. हरियाणाच्या पानीपतमधील हे प्रकरण आहे.
युवक कुठलाही मागचा पुढचा विचार न करता पानीपतच्या हॉटेलमध्ये पोहोचला. तिथे त्याच्यासोबत काय घडणार आहे? याची त्याला अजिबात कल्पना नव्हती. युवकाने हॉटेलमध्ये रुम बुक केली. बाहेर येऊन तो गर्लफ्रेंडची प्रतिक्षा करत होता. गर्लफ्रेंड येताच दोघे रुममध्ये जाण्यासाठी निघाले. त्याचवेळी अचानक चार मुलं तिथे आली. त्यांनी दोघांना जबरदस्ती कारमध्ये बसवलं. मुलीला नंतर सोडून दिलं. पण मुलाला आपल्यासोबत ठेवलं. त्यानंतर फोन करुन मुलाच्या कुटुंबियांकडे 20 लाख रुपयाची खंडणी मागितली.
ती अजून फरार
पानीपत पोलिसांनी वेगाने कारवाई करत अवघ्या 30 तासात अपहरणाच्या या सर्व कटाचा उलगडा केला. सीआयए-2 टीमने या प्रकरणात चार आरोपींना अटक केली. पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा करण्यात यश मिळवलं. पण या गुन्ह्याची मास्टरमाइंड युवकाची गर्लफ्रेंड अजून फरार आहे. तिचा शोध पोलीस घेत आहेत.
पोलीस Action मध्ये
डीएसपी सतीश वत्स यांनी माहिती देताना सांगितलं की, “मंगळवारी संध्याकाळी 4 च्या सुमारास माहिती मिळाली की, सिवाह गावातील एका हॉटेलवर युवक-युवती पोहोचले. त्याचवेळी चार मुलं स्कॉर्पियो गाडी घेऊन तिथे आले. त्यांनी दोघांना कारमध्ये टाकून अपहरण केलं. घटनेची माहिती मिळताच पोलीस Action मध्ये आले” एसपी लोकेंद्र सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली सीआयए-2 टीमने लगेच पावलं उचलली. चारही आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांनी काय सांगितलं?
सतीश वत्स यांनी सांगितलं की, “या दरम्यान हैराण करणारी बाब समोर आली आहे. मुलगीच या सगळ्या प्लानची मास्टरमाइंड आहे. तिने चार मित्रांसोबत मिळून युवकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं. सध्या युवती फरार असून तिचा शोध सुरु आहे. लवकरत तिला पकडण्यात येईल”