Murder : सख्ख्या भावाची हत्या करुन डेडबॉडी फ्रिजमध्ये ठेवली आणि फरार झाले; हत्ये मागचे कारण समजल्यावर पोलिसांनी लावला डोक्याला हात

नवी दिल्ली : सख्खा भाऊ, पक्का वैरी… अशी म्हण आहे. मात्र या म्हणीपेक्षा भयंकर कृत्य दोघा भावांनी केल्याची धक्कादायक घटना राजधानी दिल्लीत घडली आहे. दोघा भावांनी आपल्या सख्ख्या भावाची हत्या केली. यानंतर त्यांनी त्याचा मृतदेह घरातील फ्रिजमध्ये(fridge ) ठेवला आणि दोघेही फरार झाले. पोलिसांच्या तपासा दरम्यान धक्कादायक सत्य समोर आले आहे. फक्त पैशांसाठी या दोघा […]

Murder : सख्ख्या भावाची हत्या करुन डेडबॉडी फ्रिजमध्ये ठेवली आणि फरार झाले; हत्ये मागचे कारण समजल्यावर पोलिसांनी लावला डोक्याला हात
Follow us
| Updated on: Jul 24, 2022 | 5:07 PM

नवी दिल्ली : सख्खा भाऊ, पक्का वैरी… अशी म्हण आहे. मात्र या म्हणीपेक्षा भयंकर कृत्य दोघा भावांनी केल्याची धक्कादायक घटना राजधानी दिल्लीत घडली आहे. दोघा भावांनी आपल्या सख्ख्या भावाची हत्या केली. यानंतर त्यांनी त्याचा मृतदेह घरातील फ्रिजमध्ये(fridge ) ठेवला आणि दोघेही फरार झाले. पोलिसांच्या तपासा दरम्यान धक्कादायक सत्य समोर आले आहे. फक्त पैशांसाठी या दोघा भावांनी आपल्या सख्ख्या भावाचा जीव घेतल्याचे धक्कादायक वास्तव पोलिस तपास दरम्यान समोर आले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली.

मृतदेह फ्रिजमध्ये लपवला

देशाची राजधानी दिल्लीत ही खळबळजनक घटना घडली आहे. एका 50 वर्षीय व्यक्तीची त्याच्या सख्ख्या भावांनी हत्या केली आहे. घरात दरोडा टाकण्याच्या उद्देशाने या दोघांनी भावाची हत्या करून त्याचा मृतदेह घरात ठेवलेल्या फ्रीजमध्ये लपवून ठेवला. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींपैकी एक हा मृताचा सख्खा भाऊ आहे.

मृत व्यक्तीचे नाव झाकीर असे असून तो दिल्लीतील सीलमपूर भागात राहत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 जुलै रोजी त्याची हत्या झालेय. घरातच ठेवलेल्या फ्रीजमधून झाकीरचा मृतदेह सापडला होता. या प्रकरणी पोलिसांनी 55 वर्षीय आबिद हुसेन आणि मृत झाकीरचा भाऊ 25 वर्षीय जाहिद यांना अटक केली आहे.

पैशांसाठी भावाचा जीव घेतला

झाकीर घरात एकटाच राहत होता आणि झाकीरच्या घरात बरीच रोकड ठेवल्याची माहिती दोघांना मिळाली होती. रोकड लुटण्याच्या उद्देशाने दोघेही झाकीरच्या घरी गेले आणि जाकीरच्या डोक्यात लोखंडी हातोड्याने वार करून त्याचा खून केला. त्यानंतर घरात ठेवलेली रोकड व दागिने लंपास केले. यानंतर मृतदेह फ्रीजमध्ये ठेवून ते पळून गेल्याची कूली त्यांनी चौकशीदरम्यान पोलिसांना दिली.

पोलिसांनी चार लाखांचा ऐवज, दागिने आणि हत्येत वापरलेला हातोडा जप्त केला आहे. मृत झाकीर हा घरात एकटाच राहत होता. तर झाकीरची पत्नी आणि मुले त्याच्यापासून फार पूर्वीपासून विभक्त झाली होती. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.