Kolhapur CCTV : खोट्या नोटा गाडीसमोर टाकल्या, आजोबांना बोलण्यात गुंतवलं! मग हळूच गाडीतून मोबाईल-बॅग लंपास

Kolhapur Shahupuri Crime: दिवसाढवळ्या या माणसाला लुटण्यात आल्याचं सीसीटीव्ही फुटेजमुळे उघडकीस आलंय. कोल्हापूरच्या शाहूपुरी भागात ही घटना घडली.

Kolhapur CCTV : खोट्या नोटा गाडीसमोर टाकल्या, आजोबांना बोलण्यात गुंतवलं! मग हळूच गाडीतून मोबाईल-बॅग लंपास
कोल्हापुरातील चोरीची घटना सीसीटीव्हीत कैदImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 19, 2022 | 1:51 PM

कोल्हापूर : कोल्हापुरात (Kolhapur Crime) एका वृद्ध माणसाला लुटण्यात आलंय. गाडीत बसलेल्या या माणसाचा मोबाईल आणि बॅग लंपास करण्यात आली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दिवसाढवळ्या या माणसाला लुटण्यात (Old men Loot) आल्याचं सीसीटीव्ही फुटेजमुळे (CCTV Video) उघडकीस आलंय. कोल्हापूरच्या शाहूपुरी भागात ही घटना घडली. आधी या वृद्ध माणसाच्या गाडीसमोर खोट्या नोटा फेकण्यात आल्या. त्यानंतर काहींनी गाडीच्या आजूबाजूला टेहाळणी केली. मग खोट्या नोटा पडल्याचं सांगून आजोबांना गाडीचा दरवाजा उघण्यास प्रवृत्त केलं. त्यानंतर हळूच साईड सीटचा दरवाजा उघडला. सीटवरची बॅग आणि मोबाईल फोनवर हात साफ केला आणि मग बेमालूमपणे हे सगळेजण पसार झाले. यात कुठे धावपळ, गडबड, गोंधळ घडल्याचं दिसत नाहीये. वृद्ध व्यक्तीला बोलण्याच्या नादात गुंतवून चोरांची चलाखीनं बॅग आणि मोबाईल लांबवलाय.

नेमकं झालं काय?

कोल्हापुरातील शाहूपुरीत एक मारुची सुझुकीची सिलारीओ कार उभी होती. एक वृद्ध व्यक्ती या कारच्या ड्रायव्हिंग सीटवर बसलेली दिसते. दरम्यान, सुरुवातील काही लोक या गाडीच्या आजूबाजूला टेहाळणी करतात.

त्यानंतर एक जण आपल्याच खिशातून नोट खाली रस्त्यावर पाडतो. या सगळ्यांपैकी एक इसम काचेतून बोलण्याचा प्रयत्न करतो. तुमचे पैसे पडल्याचं वृद्ध व्यक्तीला सांगतो. वृद्ध व्यक्तीही पैसे पडले असावेत, या शंकेनं गाडीचा दरवाडा उघडतो आणि इथेच सगळा घोळ होतो.

आणि सगळ्यांनी धूम ठोकली

वृद्ध व्यक्तीनं गाडीचा दरवाजा उघडताच तो खाली वाकून पैसे पाहतो. एक माणूस त्याला पैसे उचलूनही देताना व्हिडीओमध्ये दिसला आहे. या सगळ्या गडबडीत ड्रायव्हिंग सीटच्या बाजूचा दरवाजा एक जण हळूच उघडतो. सीटवर ठेवलेली बॅग आणि मोबाईल फोन हातचलाखीनं बाहरे काढतो आणि अलगद दरवाजा बंद करुन धूम ठोकतो. त्यानंतर हळूहळू सगळेकडे पसार होतात. इतक्यात गाडीत बसलेल्या वृद्ध व्यक्तीला आपली बॅग आणि मोबाईल चोरीला गेल्याचं ध्यानात येतं. मात्र तोपर्यंत सगळेच पसार झालेले असतात.

या चोरीचं संपूर्ण सीसीटीव्ही समोर आलेलं असून आता पोलिसांसमोर या चोरट्यांचा शोध घेण्याचं आव्हान उभं ठाकलंय. शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेनं गाडीत बसलेल्यांना लुटणाऱ्यांपासून सावध राहण्याचं आणि सतर्कता बाळगण्याचंही आवाहन केलं जातंय.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

Kolhapur CCTV : खोट्या नोटा गाडीसमोर टाकल्या, आजोबांना बोलण्यात गुंतवलं! मग हळूच गाडीतून मोबाईल-बॅग लंपास

भयंकर! ‘तसल्या’ व्हिडीओत बायको दिसल्याचा संशय, Video पाहून झाल्यावर नवऱ्यानं केली बायकोची हत्या

मुलीच्या छेडछानीवरून वाद, हिंगोलीत गळ्यावर वार करून तरुणाचा खून

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.