Kolhapur Suicide : कोल्हापुरात डॉक्टर तरुणीची आत्महत्या! स्वतःच इंजेक्शन घेऊन आयुष्य संपवलं

Kolhapur Doctor Suicide : संशयास्पदरीत्या डॉक्टर अपूर्वाचा मृतदेह आढळून आल्यामुळे पोलिसांकडून आता अधिक तपास केला जातो आहे.

Kolhapur Suicide : कोल्हापुरात डॉक्टर तरुणीची आत्महत्या! स्वतःच इंजेक्शन घेऊन आयुष्य संपवलं
कोल्हापूरमध्ये डॉक्टरची आत्महत्याImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jul 11, 2022 | 7:53 AM

कोल्हापूर : कोल्हापुरात डॉक्टर तरुणीने आत्महत्या (Kolhapur Suicide) केल्यानं एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या तरुणीचा मृतदेह (Dead body) फुटपाथवर आढळून आला आहे. या तरुणीने आत्महत्या (Suicide News) का केली, याचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. आता पोलीस या आत्महत्येप्रकरणी अधिक तपास करत आहेत. आत्महत्या करणाऱ्या तरुणीचं नाव अपूर्वा हेंद्रे असं आहे. अपूर्वा ही कोल्हापूर जिल्हा मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि प्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ प्रवीण हेंद्रे यांनी कन्या आहे. अपूर्ण हेंद्रे या तरुणीनं स्वचःत हातावर इंजेक्शन घेत आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. न्यू शाहूपुरीतील फुटपाथवर या तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे. त्यानंतर एकच खळबळ उडाली. दरम्यान, अपूर्वाच्या आत्महत्येचं वृत्त कळल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनाही मोठा धक्का बसला आहे.

व्हिसेरा राखून ठेवला!

संशयास्पदरीत्या अपूर्वाचा मृतदेह आढळून आल्यामुळे पोलिसांकडून आता अधिक तपास केला जातो आहे. पोलिसांनी अपूर्वाचा व्हिसेरा राखून ठेवला असून त्याच्या रिपोर्टमधून अधिक खुलासे होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. सध्या शाहूपुरी पोलीस या घटनेप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून अस्वस्थ

अपूर्वा ही गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ असल्याचंही सांगितलं जातंय. आत्महत्येआधी नेमकं काय घडलं, याबाबतही पोलीस सध्या तपास करत आहेत. रात्री उशिरा अपूर्वा घरी आली होती. त्यानंतर मध्यरात्री एक वाजता ती पुन्हा घराबाहेर पडली होती. बराच वेळ ती घरी न आल्यानं तिच्या वडिलांनी शोध घेण्यास सुरुवात केली होती. अनेक ठिकाणी तिचा शोध घेण्यात आला.

हे सुद्धा वाचा

पण ती कुठेच न सापल्यानं अखेर याबाबत पोलिसांमध्ये तक्रार देण्यात आली. दरम्यान, न्यू शाहूपुरी भागातीली रिक्षा स्टॉपजवळ तिचा मृतदेह आढळाला. यानंतर तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं. पण तिथं तिला मृत घोषित करण्यात आलं.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.