मुंबई पोलीस कर्मचाऱ्याकडून कोल्हापुरात बलात्कार, अल्पवयीन मुलगी गरोदर
कोल्हापुरात एक अत्यंत घृणास्पद घटना घडली आहे. येथे नागरीकांची सुरक्षा करणाऱ्या पोलिसाकडूनच एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला आहे. कोल्हापीर जिल्ह्यातल्या पन्हाळा तालुक्यातील ही संतापजनक घटना घडली आहे.
कोल्हापूर : कोल्हापुरात एक अत्यंत घृणास्पद घटना घडली आहे. येथे नागरीकांची सुरक्षा करणाऱ्या पोलिसाकडूनच एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला आहे. कोल्हापीर जिल्ह्यातल्या पन्हाळा तालुक्यातील ही संतापजनक घटना घडली आहे.
राजेंद्र गणपती पाटील असं अत्याचार करणाऱ्या पोलिसाचं नाव आहे. राजेंद्र पाटील हा पन्हाळा तालुक्यातील करंजफेन गावचा आहे. संबंधित पोलीस हा मुंबई पोलीस दलात कार्यरत असल्याची प्राथमिक माहिती आहे.
अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. आरोपी पाटील विरोधात पन्हाळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, एका पोलिसानेच असे कृत्य केल्याने संपूर्ण परिसरात या घटनेमुळे खळबळ माजली आहे.
अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देत वारंवार बलात्कार
उत्तर प्रदेशच्या सोनभद्रमध्ये दोन वर्षांपूर्वी एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना समोर आली होती. आरोपीने पीडितेवर सलग सहा ते सात महिने अत्याचार केला. त्यातून पीडिता गर्भवती राहिल्यानंतर संबंधित संतापजनक घटना समोर आली. आरोपी पीडितेला जीवे मारण्याची धमकी द्यायचा. या प्रकरणी पीडितेच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. गेल्या दोन वर्षांपासून या प्रकरणी कोर्टात खटला सुरु होता. अखेर कोर्टाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच कोर्टाने आरोपीला 1 लाख 5 हजारांचा दंड ठोठावला आहे. आरोपीने दंडाची रक्कम न भरल्यास त्याला आणखी 6 महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागेल, असे निर्देश कोर्टाने दिले आहेत.
नेमकं प्रकरण काय?
संबंधित घटना ही सोनभद्रच्या शक्तिनगर पोलीस ठाणे हद्दीतील एका गावात घडली होती. पीडितेच्या आईने 1 ऑक्टोबर 2019 रोजी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. आरोपीचं नाव दीपक भारती असं आहे. दीपक भारती हा आपल्या मुलीवर गेल्या सहा ते सात महिन्यांपासून जीने मारण्याची धमकी देऊन अत्याचार करत होता. त्याच्या या कुकृत्यांमुळे इयत्ता आठवीत शिकणारी पीडिता गरोदर झाली, अशी तक्रार पीडितेच्या आईन पोलिसात केली होती. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपी विरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. तसेच पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या.
धक्कादायक, नागपुरात दर महिन्याला 18 महिलांवर अत्याचार; विनयभंग, अपहरणाची संख्या वाढली!https://t.co/LhiXssp3lI@NagpurPolice #nagpur #Crime
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 13, 2021
संबंधित बातम्या :