माणुसकीला काळीमा! मुलानं वडिलांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला, कारण…
कोल्हापूर जिल्ह्याच्या कागल तालुक्यात घडली संतापजनक घटना! वडिलांच्या जीवावर का उठला मुलगा?

कोल्हापूर : वडील आणि मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय. कोल्हापूरमध्ये (Kolhapur News) एका मुलाने चक्क आपल्या वडिलांना जिवंत जाळून त्यांचा जीव (Attempt to Murder) घेण्याचा प्रयत्न केला. ही खळबळजनक घटना कागल (Kagal Taluka, Kolhapur) तालुक्यातील एका गावात घडली. या घटनेनं संपूर्ण तालुका हादरुन गेलाय. तर वडील गंभीररीत्या जखमी झालेत. वडील शौचालयात गेले असता मुलाने बाहेरुन कडी लावली आणि त्यांना रॉकेल टाकून पेटवून दिल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ माजली. वडिलांचा जीव घेण्याचा कट मुलाने का रचला, याचा कारणही समोर आलंय.
मालमत्तेच्या वादातून मुलाने वडिलांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. ही लज्जास्पद घटना कागल तालुक्याच्या व्हन्नूर गावात घडली. देवबा हजारे हे शौचासाठी गेले होते. त्यावेळी बाहेरुन कडी लावून घेत त्यांच्या मुलाने आत रॉकेल टाकलं आणि त्यांना पेटवून दिलं.
पाहा व्हिडीओ :




मुलगा शिवाजी हजारे आणि शिवाजीची पत्नी सरला हजारे यांनी मिळून हा हत्येचा कट रचला होता. पण या जीवघेण्या हल्ल्यातून देवबा हजारे अगदी थोडक्यात बचावले. त्यांचा जीव वाचवा असला तरी सध्या ते गंभीररीत्या जखमी झालेत. याप्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतलाय. पुढील तपास केला जातो आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालमत्तेच्या वाटणीवरुन वडील देवबा हजारे यांच्यासोबत मुलगा शिवाजी हजारे यांच्यात वाद सुरु होता. मालमत्तेच्या वादातूनच मुलाने वडिलांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, असा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हा नोंदवून घेत आता सखौल चौकशी केली जाते आहे.
8 नोव्हेंबर रोजी सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास राहत्या घरासमोर ही धक्कादायक घटना घडली. प्रॉपर्टीत वाटणी देत नाहीस काय, तुला जिवंत जाळतो, असं म्हणत देवबा यांच्यावर त्यांचा मुलगा शिविगाळ करु लागला. त्यानंतर त्याने पेट्रोल सारखा ज्वलनशील पार्थ टाकून आग लावली आणि माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला, असा आरोप देवबा हजारे यांनी केलाय.
प्रॉपर्टीच्या वादातून अनेकदा मोठे वाद उफाळून आल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. मात्र चक्क पोटच्या पोरानेच वडिलांचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्यानं सगळेच हादरुन गेले आहेत. याप्रकरणी आता आरोपी मुलावर पोलीस काय कारवाई करतात, हे पाहणं महत्त्वाचंय.