Video : बाईक-बोलेरो समोरासमोरच भिडल्या! काळजाचा ठोका चुकवणारा कोल्हापुरातील भीषण अपघात
बोलेरो कारने वेगाने दुचाकींना धडक दिल्यानंतर अंगावर काटा आणणारा आवाज झाला होता. त्यानंतर रस्ता सोडून दुचाकी आणि एक बाईक खाली फरफटक गेलेत. तर एक बाईक रस्त्यावरच आडवी झाली होती.
कोल्हापूर : कोल्हापुरात भीषण अपघात (Kolhapur Accident News) झाला आहे. एका बोलेरो कारचे दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली. यानंतर या दुचाकींना कारने फरफटत नेलंय. अंगावर काटा आणणारा हा अपघात सीसीटीव्ही (Accident CCTV) कॅमेऱ्यात कैद झाला आहे. राधानगरी भोगावती रस्त्यावर हा भीषण अपघात झाला. घाटवडेजवळ दुचाकी आणि कार यांच्या जोरदार धडक होऊन हा भीषण अपघात झाला. यामध्ये दुचाकीस्वार जखमी झालाय. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या अपघातानं काळजाचा थरकाप उडवलाय. रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. एकाच वेळी दोन दुचाकींना बोलेरो कारनं (Bolero Car accident) धडक समोरुन धडक दिली. ओव्हरटेकींग्या नादात हा अपघात झाल्याचं सीसीटीव्ही व्हिडीओतून दिसून आलंय. चुकीच्या लेनमध्ये घुसलेल्लाय बोलेरो कारनं दोन बाईक चिरडल्यात.
ओव्हरटेकींगचा नाद
कोल्हापुरातील रात्री घडलेल्या या अपघाताच्या घटनेनं एकच खळबळ उडाली होती. कार चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला. तर दुसरीकडे समोरुन कार येताना दिसत असतानाही एक दुचाकीस्वार ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होता. बोलेरो कारने वेगाने दुचाकींना धडक दिल्यानंतर अंगावर काटा आणणारा आवाज झाला होता. त्यानंतर रस्ता सोडून दुचाकी आणि एक बाईक खाली फरफटक गेलेत. तर एक बाईक रस्त्यावरच आडवी झाली होती.
थोडक्याच वाचले!
बाईक आणि दुचाकीमध्ये झालेली धडक इतकी भीषण होती की, बाईकचा चक्काचूर झालाय. तर कारच्या बोनेटलाही मार बसलाय. सुदैवानं या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. दोन्ही बाईकवरील व्यक्तींना जबर मार बसलाय.
पाहा व्हिडीओ :
Kolhapur Bikr-Car Accident | राधानगरी भोगावती रस्त्यावर भीषण अपघात, अपघात CCTV मध्ये कैद – tv9#CarBikeAccident #CCTV #Kolhapur #Radhanagari #BhogavatiRoad #Maharashtra pic.twitter.com/ZlQsgpBF4H
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 26, 2022
दरम्यान, हा अपघात झाल्यानंतर तातडीनं स्थानिकांनी धाव घेत बचावकार्य केलंय. या भीषण अपघातानं प्रत्यक्षदर्शींच्या काळजाचा ठोका चुकवलाय. स्थानिकांनी लगेचच जखमींवर उपचारासाठी मदत केली. या घटनेमुळे बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांना शिस्त कधी लागणार, असा सवाल पुन्हा एकदा उपस्थित झालाय.