Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kolhapur : छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराजांच्या पोस्टरसमोर सिगारेट ओढत कोल्हापुरात पोरींचा धिंगाणा! संतापजनक व्हिडीओ व्हायरल

Kolhapur Viral Video : नशापान करत मुली थिरकत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसून आलं आहे. कोल्हापुरातील हा प्रकार असून या व्हायरल व्हिडीओवर अनेकांनी आक्षेप नोंदवला आहे.

Kolhapur : छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराजांच्या पोस्टरसमोर सिगारेट ओढत कोल्हापुरात पोरींचा धिंगाणा! संतापजनक व्हिडीओ व्हायरल
व्हायरल व्हिडीओImage Credit source: Twitter Video Grab
Follow us
| Updated on: Aug 16, 2022 | 10:44 AM

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज (Shivaji Maharaj And Shahu Maharaj ) यांच्या पोस्टर समोर धिंगाणा घालत मुलींनी धिंगाणा घातल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. व्हायरल व्हिडीओमुळे (Kolhapur Viral Video) प्रचंड संतपा व्यक्त केला जातोय. डॉल्बीच्या तालावर सिगरेट ओढत, नशापान करत मुली थिरकत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसून आलं आहे. कोल्हापुरातील हा प्रकार असून या व्हायरल व्हिडीओवर अनेकांनी आक्षेप नोंदवला आहे. शिव-शाहू प्रेमींमध्ये या व्हिडीओविरोधात संतापाची भावना उसळली आहे. शिवसेना शहर प्रमुख रविकिरण इंगवले लक्ष्मीपुरी पोलिस (Kolhapur Police) ठाण्यात या व्हायरल व्हिडीओप्रकरणी मुलींविरोधात तक्रार दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

व्हिडीओमध्ये नेमकं काय?

व्हायरल व्हिडीओमध्ये एक डीजे लावण्यात आल्याचं दिसून आलं आहे. या डीजेच्या स्पीकरवर पंचगंगा तालीम असं लिहिण्यात आलं. त्याच पोस्टरवर एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो आहे तर दुसऱ्या बाजूला छत्रपती शाहू महाराज यांचा फोटो आहे. डीजेवर प्रसिद्ध चंद्रमुखी या गाण्याचं रिमिक्स सुरु आहे. मोठ्या प्रमाणात डीजेच्या स्पीकरसमोर गर्दी आहे. तरुण तरुणीच्या डीजेच्या तालावर थिरकत आहेत. अशातच काही मुली या चक्क सिगरेट ओढत आहेत. काही तृतीयपंथीही तिथं उपस्थित असल्याचं दिसून आलं आहे. एक मिनिटं 19 सेकंदाचा हा व्हिडीओ असून कोल्हापूरमधील व्हॉट्सअप आणि सोशल मीडिया ग्रूपवर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

हे सुद्धा वाचा

पाहा व्हिडीओ :

नेमकं प्रकरण काय?

श्रावणातल्या तिसऱ्या सोमवारी जग म्हणून एक धार्मिक कार्यक्रम घेता जात असतो. हा एक तृतीयपंथीयांचा धार्मिक कार्यक्रम आहे. यावेळी मंडळांकडून तृतीयपंथीयांचं स्वागत केलं जातं. आधी वेगळ्या प्रकारे स्वागत तृतीयपंथीयांचं स्वागत केलं जात असे. त्यांचे पाय धुणे, त्यांचा सन्मान करणे, इत्यादी प्रकारे तृतीय पंथीयांचं स्वागत वेगवेगळ्या मंडळांकडून केलं जात असे. पण गेल्या काही वर्षात या सगळ्या गोष्टींपेक्षाही डीजे आणि धांगडधिंगा याला जास्त महत्त्व प्राप्त झालं. त्यातूनच हा प्रकार घडला असल्याचं चर्चा रंगली आहे.

खुलेआम धांगडधिंगा घालणे, सिगरेट ओढणे, नशाबाजी करणे आणि गोंधळ घालण्याच्या याप्रकाराविरोधात आता कोल्हापूरमध्येच नव्हे तर राज्यभर संताप व्यक्त केला जातोय. शिवप्रेमी आणि शाहूप्रेमी यांनी या व्हायरल व्हिडीओनंतर संताप व्यक्त केला असून कारवाईची मागणीही केली जातेय.

जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात..
जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात...
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'.
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल.
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?.
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम.
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?.
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?.
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार....
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार.....
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल.
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की.