एकाच दिवसात डबल फटका,आधी फोन चोरीला गेला, काही मिनिटांतच हजारो रुपयेही गमावले; कुठे घडली ही घटना ?

पाकिटमारांनी लोकांचे मोबाईल हिसकावून त्यांचे बँक अकाऊंट हाताळालायला सुरूवात केली आहे. त्यामुळेच मोबाईल फोनवर बँक किंवा खात्याचे पासवर्ड सेव्ह करणे टाळावे, असे सांगत पोलिसांनी लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.

एकाच दिवसात डबल फटका,आधी फोन चोरीला गेला, काही मिनिटांतच हजारो रुपयेही गमावले; कुठे घडली ही घटना ?
Follow us
| Updated on: Oct 12, 2023 | 3:14 PM

कलकत्ता | 12 ऑक्टोबर 2023 : सध्या अनेक जण मोबाईलचा (mobile) वापर सर्व कामांसाठी करतात. कॉल,मेसेजेस, सोशल मीडियावर वेळ घालवणे याव्यतिरिक्त इतर कामांसाठीही मोबाईलचा वापर वाढला आहे. महत्वाच्या नोंदी, पासवर्ड्स, बँक अकाऊंट्स, ऑनलाइन पेमेंट्स , याासठी मोबाईलच युज केला जातो. बरेच जण तर तिथे पासवर्ड्सही सेव्ह करतात. मात्र यामुळे धोका वाढत आहेत. एखादवेळेस फोन हरवला (theft) किंवा चोरीला गेला तर महत्वाची माहिती नको त्या लोकांच्या हाती लागण्याची भीती असते. पैसेही गमवावे (loss of money) लागू शकतात.

अशीच एक दुर्दैवी घटना नुकतीच कलकत्ता येथे घडली आहे. तेथे एका इसमाला एकाच दिवसात डबल फटका बसला. आधी त्याचा फोन चोरी झाला आणि नंतर त्याच चोरांनी त्याच्या अकाऊंटमधून हजारो रुपयेही वळते करून घेतले. पीडित इसम बसूमधून प्रवास करताना हा गुन्हा घडला. अखेर त्याने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. न्यू अलीपूर भागात बस असताना ही चोरी झाली. त्यावेळी बसमध्ये अतिशय कमी प्रवासी होते.

चोरांना फोनद्वारे मिळतोय महत्वपूर्ण डेटाचा ॲक्सेस

एका रिपोर्टनुसार, कलकत्तामधील न्यू अलीपूर आणि आसपासच्या परिसरात अशा अनेक घटनांची नोंद झाली आहे. बस आणि ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या लोकांचे फोन हिसकावून चोरटे पळ काढतात. त्यानंतर ते फोन ओपन करून त्यांचे यूपीआय पेमेंट सुरू करून तिथे पावर्ड सेव्ह असेल तर अकाऊंटमधून सहज पैसे लंपास करतात.

कलकत्ता येथे नुकत्याच घडलेल्या चोरीच्या प्रकरणात शंकर घोष यांनी फोन आणि पैसे गमावले. बेहाला येथील ऑफीसमधून ते घरी परत येत होते. बसमध्ये बसून ते फोनवर मेसेज टाईप करत असताना चोरट्यांनी धडक दिली. बसच्या खिडकीतून त्यांचा मोबाईल हिसकावून पळ काढला. काय झालं हे समजेपर्यंत ते चोरटे दूर पळून गेले होते. मात्र घरी आल्यानंतर त्यांनी दुसरा फोन आणि सिम कार्ड खरेदी केलं तेव्हा आणखीनच मोठा धक्का बसला. चोरट्यांनी त्यांचा बँक अकाऊंटमधून तब्बल 42 हजार रुपये पळवले होते. त्यासंदर्भात त्यांना बँकेचा मेसेजही आला होता.

तक्रार केली दाखल

अखेर घोष यांनी पोलिसांत धाव घेत दोन वेगवेगळ्या तक्रारी दाखल केल्या. न्यू अलीपूर पोलिस ठाण्यात चोरीचा एक गुन्हा आणि खात्यातून पैसे काढल्याबद्दल विधाननगर सायबर सेलमध्ये दुसरा गुन्हा दाखल केला आहे. माझ्या मोबाईलमध्ये कोणताही पासवर्ड सेव्ह केलेला नव्हता आणि आपला फोन हॅक करण्यात आला असावा, असा दावाही घोष यांनी केला. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे. पिन वापरूनच कोणीतरी पैसे काढले असावेत, पिनशिवाय पैसे डेबिट होण अशक्य आहे, असे बँकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.