Kalyan Crime : एसी रिपेरिंगच्या नावाखाली रेकी करायचे, मग संधी साधत घरफोडी करुन ऐवज लुटायचे; सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी ठोकल्या बेड्या

एसी रिपेरिंगसाठी जेथे जायचा त्या इमारतीची पूर्ण रेकी करायचा. इमारतीत कोणते घर बंद आहे ते हेरायचा. त्यानंतर आपला साथीदार भावेशच्या मदतीने तो त्या इमारतीत घरफोडी करत घरातील ऐवज लुटून पसार व्हायचा.

Kalyan Crime : एसी रिपेरिंगच्या नावाखाली रेकी करायचे, मग संधी साधत घरफोडी करुन ऐवज लुटायचे; सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी ठोकल्या बेड्या
एसी रिपेरिंगच्या नावाखाली रेकी करायचे, मग संधी साधत घरफोडी करुन ऐवज लुटायचेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 22, 2022 | 12:31 AM

कल्याण : एसी रिपेरिंगच्या नावाखाली रेकी करत मग घरफोडी (Robbery) करुन ऐवज लुटणाऱ्या दोन आरोपींना कल्याण कोळसेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अजय ठठेरा आणि भावेश भगतानी अशी अटक (Arrest) करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. तर तिसरा आरोपी फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मौजमजा आणि नशेसाठी हे आरोपी चोरी करायचे. सीसीटीव्ही (CCTV) फुटेजच्या आधारे कोळसेवाडी पोलिसांनी डोंबिवली परिसरातून आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. अजय ठठेरा हा एसी रिपेरिंगचे काम करतो. पोलीस आरोपींची चौकशी करत आहेत.

एसी रिपेरिंगसाठी गेल्यानंतर इमारतीची रेकी करायचा

अजय हा एसी रिपेरिंगचे काम करत असल्यामुळे कामानिमित्त त्याचे घरोघरी जाणे असते. एसी रिपेरिंगसाठी जेथे जायचा त्या इमारतीची पूर्ण रेकी करायचा. इमारतीत कोणते घर बंद आहे ते हेरायचा. त्यानंतर आपला साथीदार भावेशच्या मदतीने तो त्या इमारतीत घरफोडी करत घरातील ऐवज लुटून पसार व्हायचा. कोळसेवाडी परिसरात आरोपींनी अशाच प्रकारे घरफोडी केली होती. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी इमारतीतील सीसीटीव्ही फुटेज तपासले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटे कैद झाले होते. या फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला.

आरोपींकडून पाच गुन्ह्यांची उकल

आरोपींना पकडण्यासाठी अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे पोलीस, उपायुक्त सचिन गुंजाळ, पोलीस आयुक्त उमेश माने पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बशीर शेख, गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक सचिन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बोचरे, पगारे यांच्यासह कर्मचाऱ्याच्या पथकाने तांत्रिक पुरावे आणि सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीचा कसून शोध घेतला. आरोपी डोंबिवलीतील आयरे गावातील राहणारा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी डोंबिवलीतून आरोपी अजयला अटक केले. अजयची चौकशी केली असता त्याने मित्राच्या मदतीने घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्यानुसार त्याचा साथीदार भावेशलाही अटक केले. आरोपीकडून आतापर्यंत पाच घरफोड्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपींनी आणखी घरफोड्या केल्या आहेत का याबाबत पोलीस तपास करत आहेत. (Kolsewadi police arrested two accused of burglary in Kalyan)

हे सुद्धा वाचा

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.