AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुणाल कामरा याच्या आर्थिक नाड्या आवळल्या,आता सरकारने उचलले हे मोठे पाऊल…

मुंबईच्या खार पोलिसांनी कुणाल कामरा याला तीन वेळा समन्स पाठवले आहे. याआधी देखील ३१ मार्च रोजी मुंबई पोलिस कामरा याच्या शिवाजी पार्क येथील घरात पोहचली होती.

कुणाल कामरा याच्या आर्थिक नाड्या आवळल्या,आता सरकारने उचलले हे मोठे पाऊल...
| Updated on: Apr 06, 2025 | 5:33 PM
Share

तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्म BookMyShow ने कॉमेडियन कुणाल कामरा यांचे नाव त्यांच्या वेबसाइटच्या आर्टीस्ट्स लिस्टवरुन हटवले आहे. तसेच कामरा याच्याशी संबधित संपूर्ण कटेन्ट वेबसाईटवरुन हटवला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक बॉलीवूड पॅरीडी सॉग्स सादर केल्यानंतर कुणाल कामरा याच्या स्टुडिओवर शिवसैनिकांना हल्ला करीत नासधूस केली आहे. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारण कुणाल कामरा यांच्यावर अनेक स्तरातून टीका टिपण्णी सुरु झाली आहे. पोलिसांनी खार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन त्याला चौकशीसाठी तीन समन्स पाठवले आहेत.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कुणाल कामरा याने गद्दार गाण्यातून नाव न घेता टीका केली होती. त्यानंतर राहुल कनाल यांनी ३ एप्रिल रोजी BookMyShow पत्र पाठवून कुणाल कामरा याच्या तिकीटांची विक्री थांबविण्याची विनंती केली होती. दुसरीकडे कॉमेडियन कुणाल कामरा तिसरे समन्स येऊन मुंबई पोलिसांच्या समोर सादर झालेला नाही. २ एप्रिल रोजी कुणाल कामरा याला तिसरे समन्स पाठवले होते. त्यात ५ एप्रिल रोजी हजर राहण्याचा आदेश पोलिसांना दिला आहे.

31 मार्च रोजी पोलिसांविरोधात कमेंट केले होते

याआधी 31 मार्च रोजी मुंबई पोलीस कॉमेडियन कुणाल कामरा याच्या घरी दाखल झाले होते. या संदर्भात सोशल मीडीयावर कामरा याने एक पोस्टच टाकली आहे. अशा पत्त्यावर जाणे, जिथे मी १० वर्षे रहात नाही.तुमचा वेळ आणि रिसॉर्सेची बर्बादी आहे.’

1 एप्रिल रोजी मद्रास हायकोर्टात हजेरी

कुणाल कामरा 1 एप्रिलला मद्रास हायकोर्टात हजर झाले होते. मुंबई पोलीस आपल्याला अटक करण्याचा संपूर्ण प्रयत्न करत आहे. त्यामुळे आपल्याला ट्रान्झिस्ट अग्रिम देण्यात आला आहे.या प्रकरणाचा सुनावणी घेत जस्टीस सुंदर मोहन यांनी कामरा याला ट्रान्झिस्ट अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. त्यानंतर कामरा याने एक्स प्लॅटफॉर्म पोस्ट शेअर केली होती. त्यात तो म्हणाला की आजच्या काळात कलांकाराजवळ दोन पर्याय आहेत. आपला आत्मा विकून डॉलरची कठपुतली बनावे,वा गुपचुप संपवावे व्हावे…

काय आहे संपूर्ण प्रकरण

कुणाल कामरा याने एका स्टँडअप कॉमेडी शोत पॅरोडी गाणे गायले होते.त्यात शिंदे यांच्यावर ‘दिल तो पागल है’ च्या ‘भोलीसी सुरत’ या  गाण्याची चाल वापरुन विडंबन केले होते. यात शिंदे यांनी गद्दार म्हटल्याने त्याच्या स्टुडिओवर शिवसैनिकांनी हल्ला केला होता. त्यानंतर दोन्ही बाजूंनी खार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.