ललीत पाटील याने हॉस्पिटलमधून विकले 300 कोटी रुपयांचे ड्रग्स, पहा कसा उघड झाला घोटाळा

जर कोणताही पोलिस अधिकारी ड्रग्ज धंद्यात सामिल असल्याचे किंवा ड्रग्स विकताना सापडला तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. ड्रग्सच्या धंद्याला संरक्षण देताना कोणताही पोलिस सापडला तर त्याला निलंबितच नाही तर पोलिस सेवेतून कायमचे बडतर्फ करण्यात येईल असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

ललीत पाटील याने हॉस्पिटलमधून विकले 300 कोटी रुपयांचे ड्रग्स, पहा कसा उघड झाला घोटाळा
Lalit Patil Devendra Fadnavis
Follow us
| Updated on: Nov 11, 2023 | 12:53 PM

मुंबई | 11 नोव्हेंबर 2023 : साकीनाका पोलिसांनी गेल्या महिन्यात ड्रग्ज माफीया ललित पाटील याच्या एका फॅक्ट्रीत छापा मारला होता आणि तेथून 300 कोटीचे ड्रग्ज जप्त केले होते. आता तपासात उघडकीस आले आहे की पुण्याच्या ससून रुग्णालयात भरती असतानाही ललित पाटील याने 300 कोटीपेक्षा जादा किंमतीचे ड्रग्जचा पुरवठा मुंबईत केला होता. साकीनाका पोलिसांनी या प्रकरणात 20 लोकांना अटक केली आहे. यात काही ड्रग्ज डिस्ट्रीब्यूटर्सचा देखील समावेश आहे. ललित पोलीस बंदोबस्तात जूनपासून 2 ऑक्टोबरपर्यंत ससूनला भरती होता. नाशिक फॅक्ट्रीत जेव्हा ड्रग्ज तयार होत होते. तेव्हा ललित पाटील याचा भाऊ भूषण आणि मॅनेजर अभिषेक त्याचे सॅंपल दाखविण्यास ससून रुग्णालयात जात होते. ललितने हिरवा झेंडा दाखवताच हे ड्रग्ज मुंबई आणि राज्याच्या वेगवेगळ्या शहरात वितरीत केले जायचे असे तपासात उघडकीस आले आहे.

ड्रग्जच्या कमाईतून सोने खरेदी

पुण्याच्या ससून रुग्णालयातून 2 ऑक्टोबरला फरार झाल्यापासून ललित पाटील आणि त्याची मैत्रीण दोघेही कायम एकमेकांच्या संपर्कात होते. पोलिसांनी ललित पाटील याच्या अनेक गुप्त ठीकाणांवर छापे मारले आहेत. या छापेमारीत पाच किलो सोने देखील मिळाले आहे. हे सोने त्याने ड्रग्जच्या कमाईतून खरेदी केले होते. पोलिसांनी या आधीही कोट्यवधी रुपयांचे सोने ललित पाटील याच्या माणसांकडून जप्त केले आहे. ललित पाटील ड्रग्जच्या मार्फत कमावलेल्या कमाईचा एक हिस्सा आपल्या एका मैत्रिणीला पाठवायचा, जेव्हा त्याला पैशाची गरज लागायची तेव्हा याच मैत्रीणीकडून घ्यायचा. ललित पाटील याला 17 ऑक्टोबरला अटक करण्यात आली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी दिले आदेश

जर कोणताही पोलिस अधिकारी ड्रग्ज धंद्यात सामिल असल्याचे किंवा ड्रग्स विकताना सापडला तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. ड्रग्सच्या धंद्याला संरक्षण देताना कोणताही पोलिस सापडला तर त्याला निलंबितच नाही तर पोलिस सेवेतून कायमचे बडतर्फ करण्यात येईल असे फडणवीस यांनी म्हटले आहे. अंमलीपदार्थांच्या तस्करीत कोणी सापडला तर त्याच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येईल. परंतू पोलिस अधिकारी जर अशा गुन्ह्यात सापडला तर त्याला केवळ निलंबित न करता घटनेच्या कलम 311 अनूसार बडतर्फ केले जाईल असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.