Gondia Crime : गोंदियात जमिनीचा वाद, कुऱ्हाडीने तिघांवर घातले घाव, 4 आरोपी अटकेत, 3 महिलांचा समावेश
गोंदिया तालुक्यातील तुमखेडा येथील नागपुरे कुटुंबात शेत जमिनीचा वाद झाला. शेतात काम करताना त्यांच्या मध्ये वाद झाला.
गोंदिया जिल्ह्यातील तुमखेडा येथे (incident at Tumkheda) जमिनीचा वाद झाला. यातून एकाने तिघांना कुऱ्हाडीने घाव घालून जखमी केले. जमिनीच्या वादातून (Land dispute) झालेल्या भांडणात कुऱ्हाड चालली. या मारहाणीत एक गंभीर जखमी झाला, तर दोन जखमी झाले आहेत. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. या प्रकरणात ग्रामीण पोलिसांनी चार आरोपींना अटक केली. त्यामध्ये एक पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. चारही आरोपींना ग्रामीण पोलिसांना (rural police) अटक करत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तीन महिलांनीही उचलली कुऱ्हाड
गोंदिया तालुक्यातील तुमखेडा येथील नागपुरे कुटुंबात शेत जमिनीचा वाद झाला. शेतात काम करताना त्यांच्या मध्ये वाद झाला. या दरम्यान मुकेश नागपुरे यांच्यासह तीन महिलांनी हसनलाल नागपुरे यांच्यावर कुऱ्हाडीने वार केले. किसन नागपुरे हे गंभीररित्या जखमी झाले. त्यांच्यावर गोंदिया येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अशी माहिती गोंदिया ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी दिली.
नेमकं काय झालं
नागपुरे कुटुंबात जमिनीचा वाद होता. शेतातच जमिनीच्या वादातून भाऊबंदकीत वाद झाला. या वादात कुऱ्हाडी काढण्यात आल्या. कुऱ्हाडीने घाव घालण्यात आले. यात किसन नागपुरे हे जखमी झाले. अन्य दोघांवरही कुऱ्हाडीचे घाव बसले. पण, किसनलाल यांना जास्त जखमा झाल्या. त्यामुळं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे कुऱ्हाडीने मारहाण करण्यात तीन महिला समोर होत्या. त्यामुळं पोलिसांनी मुकेश नागपुरेसह अन्य तीनही महिलांना अटक केली. रागाच्या भरात कुऱ्हाड काढल्याचा पश्चाताप आता त्यांना होत आहे. दुसरीकडं त्यांच्याच कुटुंबातील लोक रुग्णालयात दाखल आहेत.
व्हिडीओत काय
दोन गटात हाणामारी सुरू आहे. दहा-बारा बाया माणसं झटापट करत आहेत. कुणी लाताबुक्यांनी, तर कुणी हातात कुऱ्हाडी घेऊन मारामाऱ्या करत आहेत. ओरडण्याचा आवाज येत आहे. कुणी धुऱ्यावर उभे राहून, तर कुणी बांधीत उतरून मारहाण करत आहेत.