अनुकंपा तत्त्वावर शिक्षिकेच्या नोकरीसाठी शरीरसुखाची मागणी, लातुरात अधिकाऱ्यावर गुन्हा

नियुक्ती आदेश काढण्यासाठी आधी पैसे मागणाऱ्या अधिकाऱ्याचा निर्लज्जपणा वाढला आणि त्याने चक्क शय्यासुखाची मागणी केली (Latur ZP Officer Sexual Favors)

अनुकंपा तत्त्वावर शिक्षिकेच्या नोकरीसाठी शरीरसुखाची मागणी, लातुरात अधिकाऱ्यावर गुन्हा
Follow us
| Updated on: Mar 13, 2021 | 7:56 AM

लातूर : अनुकंपा तत्त्वावर शिक्षिकेची नोकरी देण्यासाठी लातूर जिल्हा परिषदेतील एका अधिकाऱ्याने चक्क शरीरसुखाची मागणी केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. नियुक्ती आदेश काढण्यासाठी आधी पैसे मागणाऱ्या अधिकाऱ्याचा निर्लज्जपणा वाढला आणि त्याने चक्क शय्यासुखाची मागणी केली. पीडितेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Latur ZP Officer demands Sexual Favors for Teachers Job)

2007 पासून पीडितेच्या अर्ज-विनंत्या 

लातूर शहरातील एका शिक्षण संस्थेमध्ये अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळावी, नियुक्ती पत्र देण्यात यावे, या मागणीसाठी पीडिता आणि तिची आई 2007 पासून जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागात अर्ज-विनंत्या करत आहेत. नियुक्ती आदेश काढण्यासाठी सुरुवातीला पैसे मागणाऱ्या अधिकाऱ्याने अखेर निर्लज्जपणा दाखवला. पैसे नसतील, तर शरीर दे, त्यानंतर ऑर्डर काढतो, असं वक्तव्य अधिकाऱ्याने केल्याचा आरोप आहे. पीडितेच्या तक्रारीवरुन लातूरच्या शिवाजीनगर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून चौकशी सुरु करण्यात आली आहे.

नेमकं काय झालं?

संबंधित खासगी शिक्षण संस्थेत शिक्षक असलेल्या पीडितेच्या वडिलांचं 2007 मध्ये निधन झालं. त्यानंतर पीडितेच्या आईने शिपाई पदावर नियुक्ती मिळावी, यासाठी जिल्हा परिषदेकडे प्रयत्न केले होते. मात्र त्यांना नियुक्ती देण्यात आली नाही. दरम्यानच्या कालावधीत पीडितेने शिक्षक पदासाठीचा अभ्यासक्रम पूर्ण केला. अनुकंपा तत्त्वावर आपणाला विशेष शिक्षक म्हणून नियुक्ती मिळावी, यासाठी प्रयत्न केले.

अधिकाऱ्याने आरोप फेटाळले

2017 पासून पीडिता नियुक्ती मिळवण्यासाठी प्रयत्न करत होती. अधिकाऱ्याने चक्क शरीरसुखाची मागणी केली. त्यामुळे पीडितेने पोलिसात धाव घेतली आहे. संबंधित अधिकाऱ्याशी आम्ही संपर्क केला असता त्यांनी पीडितेच्या आरोपात काहीही तथ्य नसल्याचे म्हटले आहे. (Latur ZP Officer demands Sexual Favors for Teachers Job)

नागपुरात शरीरसुखाच्या मोबदल्यात हत्या

दरम्यान, नागपुरातील चंदू महापूर हत्या प्रकरणात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ‘लव्ह, सेक्स आणि धोका’ असा पुरेपूर मसाला या हत्याकांडात भरलेला आहे. तीस वर्षीय चंदूचे ज्या तरुणीसोबत प्रेमसंबंध होते, तिनेच चंदूच्या खास आणि बालपणीच्या मित्राला हत्येची सुपारी दिली होती. त्याहून धक्कादायक बाब म्हणजे चंदूचा मित्र असलेला आरोपी भारत गुजर हा दीड लाख रुपये आणि मित्राच्या प्रेयसीकडून शरीरसुख मिळण्याच्या लालसेतून हत्येसाठी तयार झाला.

संबंधित बातम्या :

पतीनिधनानंतर शेजाऱ्याशी सूत जुळले, लग्नाला विरोधाची भीती, महिलेची प्रियकरासह आत्महत्या

आधी तिनं नवऱ्याला पॉर्न व्हिडीओ दाखवले, नंतर खुर्चीला बांधलं आणि पुढं जे केलं त्यानं महाराष्ट्र हादरला !

(Latur ZP Officer demands Sexual Favors for Teachers Job)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.