मोठ्या गुन्ह्याआधी लॉरेन्स बिष्णोईचं मौन व्रत; यावेळीही केला होता 9 दिवस उपवास

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी कुख्यात लॉरेन्स बिष्णोई गँगने घेतली आहे. फेसबुक पोस्टद्वारे याबद्दलची माहिती दिली. हा मोठा गुन्हा करण्याआधी बिष्णोईने नऊ दिवस उपवास आणि मौन व्रत केलं होतं, अशी माहिती समोर येत आहे.

मोठ्या गुन्ह्याआधी लॉरेन्स बिष्णोईचं मौन व्रत; यावेळीही केला होता 9 दिवस उपवास
लॉरेन्स बिष्णोईImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 13, 2024 | 12:50 PM

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते, माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची शनिवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्याचत आली. कुख्यात लॉरेन्स बिष्णोई गँगने या हत्येची जबाबदारी घेतली आहे. जो सलमान खान आणि दाऊद गँगची मदत करणार, त्याने आपला हिशोब लिहून ठेवावा, असं या पोस्टमध्ये लिहिलंय. गँगच्या एका सदस्याने फेसबुकवर यासंदर्भात पोस्ट लिहिली आहे. सिद्दिकींच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे तर एक जण फरार आहे. लॉरेन्स बिष्णोई गँगकडून याआधी सलमानलाही अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. काळवीट शिकार प्रकरणापासून ही गँग चर्चेत आहे. या गँगबद्दल आता आणखी एक खुलासा झाला आहे. कोणताही मोठा गुन्हा करण्याआधी लॉरेन्स बिष्णोई हा नऊ दिवस उपवास करत असल्याची माहिती समोर येत आहे.

‘आज तक’ या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, साबरमती तुरुंगात लॉरेन्स बिष्णोईने नवरात्रीत नऊ दिवसांचा मौन व्रत केला होता. यादरम्यान तो कोणाशी काहीच बोलायचा नाही. त्याचसोबत तो काही खायचाही नाही. जेव्हा जेव्हा बिष्णोई हे व्रत करतो, तेव्हा त्याच्या गँगकडून मोठा गुन्हा करण्यात येतो, असं मानलं जातंय. नुकताच लॉरेन्स बिष्णोईचा एक व्हिडीओ कॉल सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये तो पाकिस्तानच्या गँगस्टरशी बोलत होता आणि ईदच्या शुभेच्छा देत होता. बिष्णोईने साबरमती तुरुंगातूनच हा कॉल केला होता, असा दावा केला जात आहे. मात्र व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर साबरमती जेल प्रशासनाने तो जुना व्हिडीओ असल्याचं म्हणत आपले हात झटकले.

मिळालेल्या माहितीनुसार, लॉरेन्स बिष्णोईला साबरमती तुरुंगात एका वेगळ्या सेलमध्ये ठेवलं गेलंय. ते तुरुंगातूनच फोनचा वापर करतो. बिष्णोईच्या जेवणात सहसा दूध, दही आणि फळ यांचा समावेश असतो. याशिवाय तो तुरुंगात बॅडमिंट खेळतो आणि व्यायामावरही अधिक भर देतो. तिहार तुरुंगात असतानाही बिष्णोईकडून फोनचा वापर झाला होता.

हे सुद्धा वाचा

लॉरेन्स बिश्नाई हा पंजाबच्या फजिल्ला इथल्या अबोहर भागात राहणारा आहे. तो 2018 मध्ये देशभरात चर्चेत आला होता. कारण त्यावेळी त्याने बॉलिवूड स्टार सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यावेळी पोलिसांनी त्याच्या गँगशी संबंधित काही शूटरला अटक केली होती. याशिवाय काही शूटर सलमानच्या घराबाहेर रेकी करताना आढळले होते.

निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?.
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '.
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे.
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड.
भुजबळांचा सरकारला घरचा आहेर; हत्येची जबाबदारी गृहमंत्र्यांची नाही तर…
भुजबळांचा सरकारला घरचा आहेर; हत्येची जबाबदारी गृहमंत्र्यांची नाही तर….
'तुम्ही सिंघम ना, आता राष्ट्रपतींनी तुम्हाला परमवीर चक्र द्यायचं का?'
'तुम्ही सिंघम ना, आता राष्ट्रपतींनी तुम्हाला परमवीर चक्र द्यायचं का?'.
'गृहमंत्र्यांना हकला; रात्री हुडी घालून..', राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
'गृहमंत्र्यांना हकला; रात्री हुडी घालून..', राऊतांचा फडणवीसांवर निशाणा.
सिद्दिकींची हत्या; कुठे होणार अंत्यसंस्कार? कूपरमध्ये शवविच्छेदन सुरु
सिद्दिकींची हत्या; कुठे होणार अंत्यसंस्कार? कूपरमध्ये शवविच्छेदन सुरु.
सिद्दिकींची हत्या करणारे बिश्नोई गँगशी सबंधित, तपासातून काय आलं समोर?
सिद्दिकींची हत्या करणारे बिश्नोई गँगशी सबंधित, तपासातून काय आलं समोर?.
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी 2 आरोपी अटकेत, तिसऱ्याची ओळख पटली
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी 2 आरोपी अटकेत, तिसऱ्याची ओळख पटली.