भरधाव वेगात गाडी, अचानक समोर बिबट्या आला अन् चंद्रपुरात पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू
पोलीस उपनिरीक्षक अविनाश पडोळे भरदुपारी 12 वाजता बल्लारपूर येथून शहरात दुचाकीने येत होते. यावेळी चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावरुन जात असताना त्यांच्यासमोर एक बिबट्या आला. वळणावर बिबट्या रस्ता ओलांडत असल्यामुळे वेगात येत असलेल्या पडोळे यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले.
चंद्रपूर : दुचाकीपुढे बिबट्या आल्याने भीषण अपघात झाल्यामुळे सहायक पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावर बॉटनिकल गार्डन वळणावर ही घटना घडली असून अविनाश पडोळे असे मृत्यू झालेल्या उपनिरीक्षकाचे नाव आहे.
रस्ता ओलांडताना समोरुन बिबट्या आला
मिळालेल्या माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक अविनाश पडोळे भरदुपारी 12 वाजता बल्लारपूर येथून शहरात दुचाकीने येत होते. यावेळी चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावरुन जात असताना त्यांच्यासमोर एक बिबट्या आला. वळणावर बिबट्या रस्ता ओलांडत असल्यामुळे वेगात येत असलेल्या पडोळे यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. परिणामी अधिक रक्तस्त्राव झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
रक्तस्त्राव झाल्याने पडोळे यांचा मृत्यू
पडोळे चंद्रपूरच्या पोलीस अधिक्षक कार्यालयात बिनतारी संदेश वहन विभागात कार्यरत होते. या अपघाताची घटना घडल्यानंतर पोलिसांनी पथक पाठवून अधिक तपास सुरु केला आहे. मात्र अचानकपे पडोळे यांचा मृत्यू झाल्यामुळे कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची अकाली एक्झिट झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
बुलडाण्यात वाघाची दहशत
तर दुसरीकडे, बुलडाणा जिल्ह्यातील खामगावात वाघ दिसल्याने नागरिकांत दहशत निर्माण झाली आहे. वनविभागाने या वाघाचा शोध सुरू केला असून वाघाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओ मधील प्राणी हा वाघ आहे की अन्य काही याचा तपास वनविभागाकडून घेतला जातोय.
वाघाचा व्हिडीओ सीसीटीव्हीत कैद, वनविभागाकडून तपास सुरु
मेळघाटात तसेच सातपुड्यात दिसणारा वाघ चक्क खामगाव शहरातच दिसून आल्याने खळबळ उडाली आहे. खामगावच्या गाडगे बाबानगरातील महाकाल चौक परिसरात वाघाचा वावर सीसीटीव्हीत कैद झालाय. यामुळे खामगाव शहरात असलेल्या नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सीसीटीव्हीत कैद झालेला वाघाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. मात्र हा वाघच आहे की अन्य कोणता प्राणी ? हे वांविभागाचया शोधानंतर कळेल.
इतर बातम्या :