टीबी हॉस्पिटलमध्ये दारू पार्टी, रात्री सुपरवायझरने अडवलं, त्यानंतर तुंबळ मारामारी
ज्यावेळी रात्री अतिदक्षता विभागात पार्टी सुरु होती, त्यावेळी तिथ असणाऱ्या वरिष्ठांनी ते रोकण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिथं भांडण झालं. त्यानंतर दारुची पार्टी करणाऱ्या डॉक्टरांनी मारहाण केल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.
अल्वार : एका टीबी रुग्णालयात पार्टी (TB Hospital Alwar) सुरु होती, त्यावेळी तिथं असलेल्या एका सुपरवायझरने (Supervisor)थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला मारहाण करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तीन लोकांची कमिटी तयार करण्यात आलीा आहे. त्यामध्ये पीएमओ डॉ सुनील चौहान (PMO DR SUNIL CHOUHAN), डिप्टी कंट्रोलर विजय सिंह चौधरी यांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणात दोषी आढळणाऱ्या व्यक्तींवरती गु्न्हा दाखल करण्यात येणार असल्याचं कमिटीनं जाहीर केलं होतं.
पोलिस आणि डॉक्टर करणार चौकशी
या प्रकरणाची तीन जणांची कमिटी चौकशी करणार आहे. झालेल्या प्रकरणाची कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाली आहे. पोलिसांनी घटना स्थळाची पाहणी केल्यानंतर तिथून काही रिकाम्या बॉटल्स ताब्यात घेतल्या आहेत. रुग्णालयातील रात्रीचे सुपर वायझर सुदेश चौधरी यांनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. हा सगळा प्रकार अतिदक्षता विभागात घडला आहे. डॉ. पुष्पराज आणि जितेन्द्र शर्मा यांची दारुची पार्टी सुरु होती. या प्रकरणाची चौकशी डॉ अशोक महावर , डॉ. योगेश उपाध्याय आणि ड्यूटी कर्मचारी सूरजभान, नर्सिंग अधीक्षक सुशीला वर्मा हे चौकशी करणार आहेत.
नेमकं काय झालं
ज्यावेळी रात्री अतिदक्षता विभागात पार्टी सुरु होती, त्यावेळी तिथ असणाऱ्या वरिष्ठांनी ते रोकण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिथं भांडण झालं. त्यानंतर दारुची पार्टी करणाऱ्या डॉक्टरांनी मारहाण केल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. या प्रकरणाची पोलिस आणि रुग्णालयातील कर्मचारी कसून चौकशी करीत आहे. ही बातमी राजस्थानमधील अल्वार जिल्ह्यातील आहे.