पतीला सोडून प्रियकरासोबत लिव्ह इन मध्ये राहत होती महिला, मग असे काय घडले की प्रियकरानेच…

पीडित महिलेचे पतीसोबत वाद होत होते. यामुळे महिला पहिल्या पतीला सोडून प्रियकरासोबत आली. दोघेही गेल्या सहा वर्षापासून लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. दोघांना 4 वर्षाची मुलगीही आहे.

पतीला सोडून प्रियकरासोबत लिव्ह इन मध्ये राहत होती महिला, मग असे काय घडले की प्रियकरानेच...
जमिनीच्या वादातून पतीने पत्नीला संपवलेImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Feb 21, 2023 | 1:03 PM

नवी दिल्ली : ड्रग्जवरुन झालेल्या भांडणातून लिव्ह इन पार्टनरनेच महिलेला जिवंत जाळल्याची घटना दिल्लीतील अमन विहार परिसरात घडली आहे. या घटनेत गंभीर जळालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मोहित असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित महिला आणि आरोपी गेल्या सहा वर्षापासून लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. मागील दहा महिन्यांपासून दोघांमध्ये वाद सुरु होते. अखेर याच वादातून आरोपीने महिलेला संपवले. महिलेला पहिल्या पतीपासून 8 वर्षाचा मुलगा आणि प्रियकरापासून 4 वर्षाची मुलगी आहे.

पतीला सोडून प्रियकरासोबत लिव्ह इन मध्ये राहत होती महिला

पीडित महिलेचे पतीसोबत वाद होत होते. यामुळे महिला पहिल्या पतीला सोडून प्रियकरासोबत आली. दोघेही गेल्या सहा वर्षापासून लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. दोघांना 4 वर्षाची मुलगीही आहे. मात्र गेल्या दहा महिन्यांपासून दोघांमध्ये सतत वाद सुरु होते. 10 फेब्रुवारी महिलेने आरोपी मोहितला मित्राच्या घरामध्ये ड्रग घेताना पाहिले.

ड्रगवरुन झालेल्या वादातून महिलेला पेटवले

यानंतर दोघांमध्ये ड्रगवरुन वाद सुरु झाला. वाद इतका विकोपाला गेला की, आरोपीने घरातील टर्पेन्टाईन महिलेच्या अंगावर ओतले आणि आग लावली. शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत महिलेला संजय गांधी मेमोरियल रुग्णालयात दाखल केले.

हे सुद्धा वाचा

एम्स रुग्णालयात उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू

महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला एम्स रुग्णालयात रेफर करण्यात आले. एम्स गेले दहा दिवस महिलेवर उपचार सुरु होते, मात्र महिलेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. सोमवारी रात्री महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी कलम 302 नुसार आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.