ऑन ड्युटी पोलिसाला जमावाची मारहाण, कुठे घडला हा धक्कादायक प्रकार ?
समाजाची रक्षा करण्याचे कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला आणि डॉक्टरालाही काही लोकांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

छत्रपती संभाजीनगर | 7 ऑगस्ट 2023 : काही नागरिकांनी ऑन-ड्युटी डॉक्टर आणि पोलिस अधिकाऱ्याला (dotocr and police attacked) मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. समाजाचे रक्षण करण्यासाठी तैनात असलेल्या पोलिसालाच बेदम मारण्यात आले. याप्रकरणी तिघा आरोपींना अटक करण्यात आल्याचे समजते.
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) सिडकोच्या एम्स (AIMS) रुग्णालयाजवळ शनिवारी संध्याकाळी हा धक्कादायक प्रकार घडला. ऑन-ड्युटी डॉक्टरांचा फोन आल्यानंतर पोलिस तेथे पोहोचले असता काही लोक डॉक्टरला मारहाण करत असल्याचे आढळले. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता जमावातील काही लोकांनी पोलिसालाही धरून मारले. हा सर्व हंगामा कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सुरूवातीला आरोपीला त्याची रस्त्यात उभी असलेली कार काढून बाजूला पार्क करण्यास सांगितली. मात्र त्याने त्यास नकार देत आक्रमकरित्या उत्तर दिले आणि हॉस्पिटलला देखील आग लावू, अशी धमकीही दिल्याचे समजते.
Video | Family beat up policeman catching him by the collar in public in Hospital premises in Aurangabad in Maharashtra. Police had arrived on complaint of Doctors being thrashed by a mob. pic.twitter.com/BaoaWXJycy
— MUMBAI NEWS (@Mumbaikhabar9) August 6, 2023
कॅमेऱ्यात कैद झाले कृत्य
डॉक्टरांच्या तक्रानीनंतर पोलिस या भागात आले होते, तेव्हा कुटुंबातील सदस्यांनी पोलिसाला पकडून त्याला मारहाण केल्याचे व्हिडीओमध्ये कैद झाले आहे. त्यांनी एका पोलिसाची कॉलर पकडून त्याला ओढले आणि तेथे जमलेल्या मोठ्या जमावासमोर मारहाण करण्यास सुरुवात केली.
तीन जणांना अटक
याप्रकरणी तीन आरोपींची ओळख पटली असून त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आले असता, त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.