Lucknow Crime : भयंकर घटना, गर्भवती पत्नीला लाथ मारली, सिगारेटचे चटके दिले, हेसुद्धा लव्ह जिहाद?
पीडित महिलेने पतीकडून फसवणूक झाल्याचा आरोप केला आहे. पतीने नाव आणि धर्म बदलून प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. पळवून नेत लखनऊला आणले. या ठिकाणी त्याने आपला अत्यंत निर्दयीपणे छळ केला, असा दावा तिने केला आहे.
लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये धक्कादायक घटनांचे सत्र सुरूच आहे. राज्यात अलीकडच्या काळात कौटुंबिक वादातून घडलेल्या गुन्ह्यांचे प्रमाण चिंताजनक वाढले आहे. याचदरम्यान ‘लव्ह जिहाद‘ची एक चक्रावून टाकणारी घटना उजेडात आली आहे. या घटनेतील आरोपी पतीने पाच महिन्यांच्या गर्भवती पत्नीच्या पोटावर लाथा मारल्या. इतकेच नव्हे तर नंतर पत्नीच्या अंगावर उकळते तेल ओतून तिला सिगारेटचे चटके देखील दिले. एका गर्भवती महिलेच्या बाबतीत घडलेल्या या अत्यंत क्रूर घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. याचवेळी आरोपी पतीच्या कृत्यावर तीव्र संताप व्यक्त केला जात असून, पतीला कठोरात कठोर शिक्षा सुनावण्याची मागणी महिलेच्या माहेरच्या नातेवाईकांनी केली आहे.
नाव आणि धर्म बदलून प्रेमाच्या जाळ्यात अडकवले
पीडित महिलेने लग्नबंधनात अडकताना पतीकडून फसवणूक झाल्याचा आरोप केला आहे. पतीने नाव आणि धर्म बदलून प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. त्यानंतर घरच्यांपासून पळवून नेत लखनऊला आणले. या ठिकाणी त्याने आपला अत्यंत निर्दयीपणे छळ केला, असा दावा तिने केला आहे.
पतीने मी गर्भवती राहिल्यानंतर कुठल्याही प्रकारची दयामाया न दाखवता छळ सुरू ठेवला. निर्दयीपणे पोटावर लाथा मारल्यानंतर आतील गर्भाला इजा पोहोचली. त्यानंतर त्याने गर्भपात करायला भाग पाडले.
एवढ्यावरच न थांबता त्याने अनैसर्गिकरीत्या शारीरिक संबंध ठेवले आणि बंदी घालण्यात आलेले मांस देखील जबरदस्तीने खायला घातले, असा आरोप महिलेने केला आहे.
महिलेच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा
पीडित महिलेने पतीकडून फसवणूक झाल्याचा आरोप केला आहे. पतीने नाव आणि धर्म बदलून प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. पळवून नेत लखनऊला आणले. या ठिकाणी त्याने आपला अत्यंत निर्दयीपणे छळ केला, असा दावा तिने केला आहे.
या छळवणुकीला कंटाळून महिलेने अधूनमधून अनेकदा पाळण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रत्येक वेळी ती आरोपीच्या तावडीत सापडली. महिलेने छळवणुकीला वैतागून पोलीस तक्रार करण्याची तयारी दर्शवली. त्यावेळी आरोपी पतीने तिला एका खोलीत बंद करून जीवे मारण्याची धमकी दिली.
याबाबत पीडित महिलेने वन स्टॉप सेंटरकडे मदत मागितली. त्यानंतर महिलेची क्रूर पतीच्या तावडीतून सुटका करण्यात आली. आरोपीला अद्याप अटक केलेली नाही.