नजर चुकवून ‘तो’ विवाहीत प्रेयसीच्या बेडरूममध्ये गेला आणि …
एका प्रेमी जोडप्याला मारहाण होत असल्याचा व्हिडीओ सध्या बराच व्हायरल होत आहे. त्या जोडप्यातील महिला विवाहीत असून तिचा प्रियकर तिला भेटण्यासाठी आला होता.
जयपूर : एका महिला आणि तरुणाला घराच्या व्हरांड्यातील खांबाला बांधून बेदम मारहाण होत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना राजस्थानच्या सवाई माधोपूर (Sawai madhopur) जिल्ह्यातील गंगापूर सिटीतील एका गावातील आहे. विवाहीत महिला आणि युवकाचे एकमेकांशी प्रेमसंबंध (Love affair)होते. तो तरूण त्याच्या विवाहीत प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला. ते दोघे बेडरूममध्ये असतानाच त्या महिलेच्या सासरच्या लोकांनी दोघांना आपत्तीजनक स्थितीत एकत्र पाहिले.
त्यानंतर घरच्यांनी त्या दोघांना पकडून घराच्या व्हरांड्याताली खांबाला बांधून ठेवले. आणि दोघांनाही बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल झाला असून त्यामध्ये पकडण्यात आलेला तरूण युवक अर्धनग्न दिसत आहे. त्याला मारहाण करतच काही लोक त्याची चौकशी करत आहेत. तर दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये महिला आणि तरुण दोघांनाही मारहाण करत त्यांना या कृत्याचा जाब विचारल्याचे दिसत आहे.
या युवकाची आधीही झाली होती पिटाई
ही महिला विवाहीत असूनही तो युवक तिला भेटण्यासाठी वारंवार येत असे. हे प्रकरण पहिल्यांदा जेव्हा तिच्या सासरच्यांना कळले तेव्हाच त्यांनी त्या युवकाला चांगले ठोकून काढले होते. त्यानंतर गावातील पंचाना बोलावून त्यांच्यासमोर त्या युवकाला चांगली समजही देण्यात आली होती. मात्र तरीही तो काही सुधारला नाहीच. तो त्याच्या विवाहीत प्रेयसीला भेटण्यासाठी पुन्हा घरी आला. यावेळी सासरच्यांनी दोघांनाही रंगेहाथ पकडले आणि मग दोघांनाही खांबाला बांधून फटकावण्यात आले. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला आहे.