पित्याला मुलाचे प्रेमसंबंध पसंत नव्हते, मग प्रेमसंबंध तोडण्यासाठी पित्याने ‘हे’ कृत्य, घटना उघड होताच पोलीसही हैराण

मुलाचे एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र घरच्यांना हे संबंध मान्य नव्हते. घरच्यांनी वेळोवेळी मुलाची समजूत काढली पण तो ऐकायला तयार नव्हता.

पित्याला मुलाचे प्रेमसंबंध पसंत नव्हते, मग प्रेमसंबंध तोडण्यासाठी पित्याने 'हे' कृत्य, घटना उघड होताच पोलीसही हैराण
प्रियकाराच्या बापानेच तरुणीचा काटा काढलाImage Credit source: Google
Follow us
| Updated on: May 24, 2023 | 4:23 PM

मेरठ : मुलाचे प्रेमसंबंध पसंत नसल्याने बापाने दुसऱ्या मुलासोबत मिळून मुलाच्या प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये घडली आहे. हत्या करुन मृतदेह कालव्याजवळ फेकून दिला. पोलिसांना नाल्यात मृतदेह सापडला होता. या हत्याकांडाचा खुलासा करण्यास पोलिसांना यश आले आहे. हत्येनंतर दोन्ही आरोपींनी मुलीचा मोबाईल आणि आधारकार्ड मृतदेहाजवळ ठेवले होते. याप्रकरणी पोलिसांनी प्रियकराच्या वडिलांना अटक केली आहे, तर अन्य आरोपी अद्याप फरार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीचे लग्न झाले होते, त्यामुळे प्रियकराच्या वडिलांना त्यांचे प्रेमसंबंध मान्य नव्हते. मुलाला अनेक वेळा समजावून सांगितले, मात्र तो ऐकत नसल्याने वडिलांनी आपल्या दुसऱ्या मुलासोबत मिळून मुलाच्या प्रेयसीची हत्या केली.

हत्या करुन कालव्याजवळ मृतदेह फेकला

मेरठमधील भद्रकाली चौकीजवळ कालव्याजवळ एका महिलेचा मृतदेह आढळून आला. मीनू असे या तरुणीचे नाव असून, ती गाझियाबाद येथील रहिवासी होती. मीनूचे सासर मेरठच्या टीपी नगर भागातील पुथा गावात आहेत. महिला कर्ज मिळवून देण्याचे काम करत होती. नेहमीप्रमाणे ती 20 तारखेलाही कर्जाबाबतच्या कामासाठी घरुन गेली होती. मात्र हस्तिनापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भद्रकाली चौकाजवळील कॅनॉलजवळ तिचा मृतदेह आढळून आला.

अर्जुनच्या वडिलांना मुलाचे प्रेमसंबंध पसंत नव्हते

मीनूचे मेरठच्या लल्लापूर नई बस्तीचा रहिवासी अर्जुन नावाच्या मुलाशी प्रेमसंबंध होते. अर्जुन आणि मीनू एकत्र काम करायचे आणि एकत्र काम करत असताना त्यांच्यात जवळीक वाढत गेली. अर्जुनचे कुटुंबीय या संबंधावर नाराज होते. विशेषतः अर्जुनचे वडील मनोज अधिक नाराज होते. याबाबत त्याने आपल्या मुलाला अनेक वेळा महिलेपासून वेगळे होण्यास सांगितले, परंतु अर्जुन वडिलांचे ऐकत नव्हता. त्यामुळे अर्जुनचे वडील मनोज यांनी आपल्या मुलाच्या प्रेयसीला संपवण्याचा कट रचला.

हे सुद्धा वाचा

पुजेच्या बहाण्याने घेऊन गेले अन् हत्या केली

प्लाननुसार, हस्तिनापूरच्या भद्रकाली मंदिरात अर्जुनच्या तब्येतीसाठी पूजा करायची असल्याचे आरोपींनी मीनूला सांगितले. मनोज आणि त्याचा मुलगा अरुण मीनूला त्यांच्यासोबत हस्तिनापूरला स्विफ्ट कारमध्ये घेऊन गेले. दोघांनी स्विफ्ट कारमध्येच मीनूची हत्या केली आणि कालव्याजवळ फेकून दिला.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.