आईच्या मृतदेहासोबत अंकिता 8 दिवस राहिली! मृतदेहाचा दुर्गंध पसरल्यानंतर घटना उघडकीस

Uttar Pradesh Crime : पोलिसांनी तपासणी करण्यासाठी दिक्षीत यांच्या घराबाहेर जाऊन दार उघडण्यास विनंती केली. पण मुलीनं दरवाजा उघडलाच नाही.

आईच्या मृतदेहासोबत अंकिता 8 दिवस राहिली! मृतदेहाचा दुर्गंध पसरल्यानंतर घटना उघडकीस
धक्कादायक घटनाImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 21, 2022 | 1:22 PM

उत्तर प्रदेशच्या लखनौमध्ये (Lucknow Crime News) एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. एका मुलीनं आपल्या आईच्या मृतदेहाशेजारीच स्वतः कैद करुन ठेवलं होतं. आठ दिवस ही मुलही आपल्या आईच्या मृतदेहासोबत (Mother dead body) एका बंद खोलीत राहत होता. मृतदेह कुजत असल्यानं त्याचा दुर्गंध पसरत गेला. त्यानंतर शेजाऱ्यांनी याबाबत पोलिसांनी (Police investigation on) माहिती दिल्यानंतर ही खळबळजनक घटना उघडकीस आली. लखनौच्या इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही खळबळजनक घटना समोर आली. रिटायर्ड इंजिनियर सुनिता दिक्षीत यांच्या मृत्यूनंतर त्यांची मुलगी मृतदेहासोबतच आठ दिवस राहत होता. आपल्या आईच्या मृत्यूबाबत या मुलीनं कुणालाच सांगितलं नाही. ना याची माहिती या मुलीनं आपल्या कुटुंबीयांना दिली आणि ना पोलिसांना कळवलं.

खळबळजनक घटना

धक्कादायक बाब म्हणजे ही शेजाऱ्यांना पोलिसांना याबाबत माहिती दिली. दुर्गंध येत असल्यानं मृतदेह कुजल्याचा संशय व्यक्त केला गेला. त्यानंतर पोलिसांनी दिक्षीत यांच्या घरी जाण्याचं ठरवलं. पोलिसांनी तपासणी करण्यासाठी दिक्षीत यांच्या घराबाहेर जाऊन दार उघडण्यास विनंती केली. पण मुलीनं दरवाजा उघडलाच नाही.

तिने दरवाजाच उघडला नाही..!

कुणीच दरवाजा उघडत नसल्यानं अखेर पोलिसांनी दरवाजा तोडून घरातील मृतदेह बाहेर काढला. घरात मृतदेह असल्याचं कळल्यानंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली होती. लखनौच्या मयूर रेसिडेन्सीमधील इमारतीत ही खळबळजनक घटना घडली. दरम्यान, मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन तपासणी केली. मृतदेहावर तूर्तासतरी पोलिसांना कोणत्याही जखमा किंवा संशयास्पद खुणा आढळून आलेल्या नाहीत.

हे सुद्धा वाचा

हत्या की आत्महत्या?

मयूर रेसिडेन्सीमध्ये सुनिता दिक्षीत आपल्या 26 वर्षांच्या मुलीसोबत राहत होत्या. त्यांच्या मुलीचं नाव अंकिता आहे. सुनिता यांचा रजनीश दिक्षीत यांच्यासोबत घटस्फोट झाला होता. सुनिता आणि अंकिता दोघीच फ्लॅटमध्ये राहत होत्या. बुधवारी रात्री पोलिसांना याबाबत शेजाऱ्यांना कळवल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्यानंतर ही खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

पाहा व्हिडीओ : जीव जाता जाता वाचला…

सुनिता यांच्या मुलीला आईच्या मृत्यूबाबात विचारणा करण्यात आली. पण अंकिताने कोणतीही माहिती दिली नसल्याचं पोलिसांनी म्हटलंय. आईच्या मृत्यूचा अंकितावर मानसिक आघात झाल्याचं पोलिसांना जाणवलंय. सध्या अंकिता आपल्या मामासोबत राहतेय. पोस्टमॉर्टेमध्ये सुनिता यांच्या डोक्याला इजा झाल्याचं दिसून आलं आहे. त्यांनी आत्महत्या केली असावी असा संशय पोलिसांना आहे. सध्या लखनौ पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.