रात्री उशीरापर्यंत पार्टी सुरू होती, तेवढ्यात झालं फायरिंग आणि ती धाडकन कोसळली… त्या विद्यार्थिनीच्या मृत्यूला कोण जबाबदार ?
पार्टीच्या ठिकाणी अनेक जण मद्यपानही करत होते. काही कारणावरून विद्यार्थ्यांचा परस्परांमध्ये वाद झाला व तो वाढून हाणामारी देखील सुरू झाली. त्यानंतर अचानक बंदुकीच्या फायरिंगचा आवाज आला आणि ती मुलगी धाडकन खाली कोसळली. पोलिसांनी घटनास्थळावरून दारूच्या बऱ्याच बाटल्या जप्त केल्या.
लखनऊ | 21 सप्टेंबर 2023 : विद्यार्थिनीच्या हत्येच्या घटनेने उत्तर प्रदेशची राजधानी असलेलं लखनऊ (crime in lucknow) शहर हादरलं आहे.तेथे एका विद्यार्थिनीची गोळी झाडून हत्या (student murder case) करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या हत्येची माहिती (crime news) मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी त्या तरूणीचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. याप्रकरणी पोलिसांनी त्या तरूणीच्या काही मित्रांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
लखनऊ शहरातील दयाल रेजिडेंसी येथे ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. मृत तरूणी तिच्या एका मित्राच्या आग्रहामुळे इथे आली होती. ती येण्यापूर्वीच या इमारतीतील एका फ्लॅटमध्ये काही अन्य लोक पार्टी करत होते तर काही जण मद्यपानही करत अशी माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निष्ठा त्रिपाठी असे मृत तरूणीचे नाव असून ती BBD कॉलेजमध्ये बी-कॉम ऑनर्सचे शिक्षण घेत होती. गणेशोत्सवानिमित्त बुधवारी BBD कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी निष्ठा उपस्थित होती. तेथे तिचे इतरही मित्र-मैत्रिणी होत्या. तिच्या मित्रांपैकी एक असलेला आदित्य पाठक याने निष्ठाला त्याच्यासोबत दयाल रेसिडन्सी येथील फ्लॅटवर येण्याचा आग्रह केला. ते दोघे तिथे पोहोचले तर काही विद्यार्थी आधीपासूनच उपस्थित होते. त्यांची पार्टी सुरू होती. काही जण मद्यपानही करत होते.
काय झालं त्या पार्टीत ?
पोलिसांच्या सांगण्यानुसार, जसजसा वेळ गेला तसी पार्टी रंगू लागली. मात्र मध्ये काही जणांमध्ये भांडण सुरू झाले. काही विद्यार्थ्यांचे एकमेकांशी भांडणही झाले असावे, असा कयास पोलिसांनी व्यक्त केला. याच दरम्यान वाद वाढल्यानंतर एका विद्यार्थ्याने देशी बनावटीचे पिस्तूल काढले आणि फायरिंग केले. त्याच फायरिंगमध्ये बंदुकीची गोळी निष्ठाला लागली आणि ती खाली कोसळली. तिच्या मित्रांनी तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केले मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
तिचे मित्र हॉस्पीटलमधून पसार झाले. अखेर रुग्णालय प्रशासनातर्फे पोलिसांना विद्यार्थिनीच्या मृत्यूची माहिती देण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस तेथे दाखल झआले व त्यांनी तपास सुरू केला.
घटनास्थळाची तपासणी केली असता असता , त्या फ्लॅटमधील किचनमधून त्यांनी दारूच्या अनेक बाटल्या जप्त केल्या. या प्रकरणी पोलिसांनी निष्ठाचा मित्र आदित्य पाठक याच्यासह अनेकांना ताब्यात घेतले आहे. पोलीस त्यांची कसून चौकशी करत आहेत.