PUBG हत्याकांड : ‘कशी तडफडत मरते, ते बघून येतो’ रात्री गोळी मारली, दुपारपर्यंत आई तडफडली! 10 तासांनी मृत्यू

Lucknow PubG murder : गोळी लागल्यानंतर निर्दयी मुलाला आईचा मृत्यू झाला नाहीये हे कळलं होतं. आई तडफडतेय, विव्हळतेय, हे त्याला कळलं होतं.

PUBG हत्याकांड : 'कशी तडफडत मरते, ते बघून येतो' रात्री गोळी मारली, दुपारपर्यंत आई तडफडली! 10 तासांनी मृत्यू
मुलानं केली आईची हत्याImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 10, 2022 | 4:32 PM

मुंबई : उत्तर प्रदेशातील पबजी हत्याकांडाने (PubG murder) अख्खा देश हादरुन गेलाय. लखनौमधील (Lucknow Murder news) हत्येची ही घटना किती क्रूर आणि थरकाप उडवणारी होती, याची प्रचिती आणखी एका तपासातून समोर आलीय. पबजी खेळायला विरोध केला म्हणून आईची मुलानं हत्या गेली. 16 वर्षीय मुलाने आईला (Son killed mother) गोळ्या घातल्या. रात्री 2 वाजता आई साखर झोपेत असताना पोरानं आईवर गोळीबार केला. रक्ताच्या थारोळ्यात पलंगावर आईचा देह रात्रभर तडफडत होता. गोळीबारात प्रचंड जखमी झालेली आई तब्बल 10 तास तडफडत होती. अखेर दुपारी 12 वाजता तिनं प्राण सोडला. पण या दरम्यान, जे घडलं ते काळजाचा थरकाप उडवणारं होतं. 16 वर्षांच्या निर्दयी मुलानं आईवर गोळ्या झाडल्यानंतर जे केलं ते क्रूरतेचा कळस गाठणारं होतं.

आईच्या हत्येची कबुली या मुलानं दिली. त्यानंतर या मुलाची पोलिसांनी कसून चौकशी केली. चौकशी नराधम मुलानं दिलेली उत्तरही हादरवणारीच होती. दरम्यान, याच चौकशीतून आता आणखी एक धक्कादायक खुलासा करण्यात आला. रात्री दोन वाजता आईवर गोळीबार केल्यानंतर हा निर्दयी मुलगा आईचा जीव गेलाय की नाही, हे पाहण्यासाठी अधूनमधून खोलीत येत होता. आई कशी तडफडतेय, मृत्यूशी झुंजतेय, याचं किळसवाणं चित्र पाहण्यासाठी हा माथेफिरु अल्पवयीन मुलगा मध्ये मध्ये खोलीत येत होता. त्यानंतर पुन्हा तो खोलीचा दरवाजा लॉक करुन बाहेर जायचा.

गन लोडेड नव्हती, पोरानंच लोड केली…

दरम्यान, आईची हत्या करण्याआधी 16 वर्षीय मुलानं कपाटातून वडिलांची गन बाहेर काढली होती. या गनच्या शेजारीच मॅगजिन ठेवलेलं होतं. ते पोरानं बंदुकीत लोड केलं. मॅगजिन लोड करताना पोराचे हात थरथरत होते. कारण याआधी त्यानं कधीच खरीखुरी गन चालवली नव्हती.

म्हणून त्यानं तिथूनच गोळी मारली…

जवळून गोळी झाडणार असल्यानं मुलाला बहिणीला गोळी लागेल, याची शंका वाटली. म्हणून तो बहिण आईशेजारी पलंगावर ज्या बाजूला झोपली होती, तिथं गेला. तिथूनच त्यानं आईवर निशाणा लावला. गन ताणली आणि आईवर गोळ्या झाडल्या. गोळी झाडल्यानंतर ती आईच्या शरीराच्या आरपार जाईल आणि बहिणीला लागेल, या भीतीनं त्यानं कुठून गोळी झाडायची, याचा निर्णय घेतला होता.

गोळीबाराच्या आवाजानं बहीण उठली…

निर्दयी मुलानं आईच्या डोक्यावर गन धरली. डोळे बंद केले आणि गनचा ट्रिगर ओढला. गोळी मारल्याचा आवाज ऐकून बहीण लगेचच जागी झाली. तर त्यानं बहिणीचं तोंड आपल्याकडे फिरवलं आणि तिचं तोंड दाबलं. त्यानंतर बहिणीला घेऊन तो दुसऱ्या खोलीत गेला आणि त्या खोलीचं दार लावून घेतलं. तोपर्यंत आईच्या डोक्याला लागलेल्या गोळीच्या जखमेतून रक्ताची धार लागली होती.

10 तासात त्याने 8 वेळा असं केलं..

गोळी लागल्यानंतर निर्दयी मुलाला आईचा मृत्यू झाला नाहीये हे कळलं होतं. आई तडफडतेय, विव्हळतेय, हे त्याला कळलं होतं. पण आईला शुद्ध नव्हती. रक्त खूप वाहून गेलं होतं. एक गोळी मारल्यानंतर आईला दुसरी गोळी मारण्याची हिंमत त्याला झाली नाही. तो प्रत्येक तासाला रुममध्ये येत होता. आई जिवंत आहे की मेली, हे बघत होता आणि पुन्हा बाहेर जात होता. मध्यरात्री 2 वाजता त्याने आईला गोळी झाडली होती. त्यानंतर प्रत्येक तासाला तो आई मेली की नाही, याची खात्री करण्यासाठी यायचा. आईला तडफडताना बघायचा आणि पुन्हा बाहेर यायचा.

अखेरे 10 तासांनी म्हणजे दुपारी 12 वाजता आईने प्राण सोडला. तेव्हा मुलाला आईचा मृत्यू झाल्याची खात्री पटली. यानंतर तीन दिवस मुलानं आईचा मृतदेह घरातच लपवून ठेवला होता. दरम्यान, डॉक्टरांनी मृतदेहाचं पोस्टमॉर्टेम केल्यानंतर अनेक बाबींचा खुलासा झालाय. गोळी लागल्यानंतर गंभीर जखमी झालेली या मुलाची आई, जिचं नाव साधना आहे, ती कोमामध्ये गेली होती. गोळी लागली तेव्हा ती गाढ झोपेत होती. गोळी आरपार गेली होती. पण तिचा मृत्यू बराच वेळानंतर झाला.

खरंतर जिथं हे कुटुंब राहत होतं, तिथूनच दोन किलोमीटरच्या अंतरावर एक रुग्णालय होतं. जर वेळीत साधनाला तिथं नेलं असतं, तर कदाचित तिचा जीव वाचू शकला असता. पाच जूनला हे पबजी हत्याकांड घडलं. सहा जूनला या मुलानं आपल्या मित्रांना घरी बोलावून अंडा करी पार्टी केली. त्यानंतर सात जूनला या हत्येचं सगळं प्रकरण उघडकीस आलं. सात जूनला या मुलानं आपल्या वडिलांना फोन करुन या हत्येबद्दल सांगितलं होतं.

Non Stop LIVE Update
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.