कृत्रिम श्वासावर जगणाऱ्या विवाहितेकडे पाहूनही वासना चाळवली, कोव्हिड सेंटरमध्ये बलात्काराचा प्रयत्न

महिलेला याची जाणीवर होताच तिने वॉर्डबॉयवर ओरडण्याचा प्रयत्न केला. या गोंधळात तो खोलीतून निसटला (COVID Centre Ward boy Rape attempt )

कृत्रिम श्वासावर जगणाऱ्या विवाहितेकडे पाहूनही वासना चाळवली, कोव्हिड सेंटरमध्ये बलात्काराचा प्रयत्न
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Apr 19, 2021 | 12:11 PM

भोपाळ : कोरोनाग्रस्त विवाहित महिलेवर बलात्काराचा प्रयत्न झाल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित महिला रुग्णालयात ऑक्सिजन सपोर्टवर कृत्रिम श्वासोच्छवास करत होती. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये विकृतीचा कळस पाहायला मिळाला. आरोपी वॉर्डबॉयला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. (Madhya Pradesh Crime Gwallior COVID Centre Ward boy allegedly Rape attempt on Corona Positive Lady)

ऑक्सिजन सपोर्टवर कोव्हिड वॉर्डात

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये एका खासगी रुग्णालयाच्या कोव्हिड सेंटरमध्ये हा प्रकार घडला. कोरोनाची लागण झाल्यानंतर संबंधित विवाहितेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ऑक्सिजनची पातळी कमी झाल्याने तिला ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं.

एकटेपणाचा फायदा घेत गैरकृत्य

शनिवारी रात्री विवेक लोधी नावाचा वॉर्डबॉय महिलेच्या कक्षात आला. महिलेला कोरोनाची लागण झाल्यामुळे त्या खोलीत कोणीही नव्हतं. याचा गैरफायदा घेत वॉर्डबॉयने महिलेसोबत गैरकृत्य करण्यास सुरुवात केली, अशी तक्रार पीडितेच्या मुलाने केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

महिलेच्या मुलाची पोलिसात तक्रार

महिलेला याची जाणीव होताच तिने वॉर्डबॉयवर ओरडण्याचा प्रयत्न केला. या गोंधळात तो खोलीतून निसटला. त्यानंतर महिलेने मुलाला फोन करुन घडलेली हकिगत सांगितली. मुलगा आपल्या नातेवाईकांना घेऊन रुग्णालयात दाखल झाला. मुलाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी वॉर्डबॉय विवेक लोधी याच्याविरोधात कलम 376 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला बेड्याही ठोकण्यात आल्या आहेत.

पीडित महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनावर हलगर्जीचा आरोप केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी वॉर्डबॉयची चौकशी सुरु केली आहे.

पनवेल क्वारंटाईन सेंटरमध्ये महिलेवर बलात्कार

पनवेल क्वारंटाईन सेंटरमध्ये 16 जुलै रोजी महिलेवर बलात्कार करण्यात आला होता. क्वारंटाईन सेंटरमध्येच कोरोना संशयित म्हणून दाखल झालेल्या एका महिलेवर आरोपीने बलात्कार केला होता. पीडित महिला आणि आरोपी या दोघांमध्येही कोरोनाची लक्षण दिसून येत असल्याने त्यांची चाचणी करण्यात आली होती. त्या आरोपीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. तर पीडित महिलेची चाचणी निगेटिव्ह आली होती.

संबंधित बातम्या :

पनवेल क्वारंटाईन सेंटर बलात्कार प्रकरण, आरोपी कोरोनाग्रस्त, पीडितेची पुन्हा चाचणी

रुग्णवाहिकेतच चालकाकडून बलात्कार, केरळमधील कोरोनाबाधित महिलेच्या आरोपांनी खळबळ

(Madhya Pradesh Crime Gwallior COVID Centre Ward boy allegedly Rape attempt on Corona Positive Lady)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.