Suicide : हातावरच सुसाईड नोट लिहून तिनं जीव दिला! पतीला म्हणाली, ‘मै बेवफा नहीं हू!’

गळफास लावून घेत पत्नीने आत्महत्या केली, अशी माहिती खुद्द पतीनेच पोलिसांना दिली.

Suicide : हातावरच सुसाईड नोट लिहून तिनं जीव दिला! पतीला म्हणाली, 'मै बेवफा नहीं हू!'
धक्कादायक घटना...Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jul 15, 2022 | 12:03 PM

मध्य प्रदेशची (Madhya Pradesh crime) राजधानी भोपाळमध्ये (Bhopal Crime News) एका विवाहीत महिलेनं आत्महत्या केली. मात्र या विवाहितेच्या (Married Women Suicide) कुटुंबीयांनी ही आत्महत्या नसून हत्या आहे, असा आरोप केला आहे. आत्महत्येचं वृत्त कळल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. गळफास लावून घेत पत्नीने आत्महत्या केली, अशी माहिती खुद्द पतीनेच पोलिसांना दिली. पण पोलीस घटनास्थळी दाखल होईपर्यंत महिलेचं गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह खाली उतरवण्यात आला होता. विशेष म्हणजे या महिलेच्या हातावरच सुसाईड नोट लिहिलेल्याचं आढळून आलं आहे. या महिलेचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला असून आता पुढील तपास केला जातो आहे. या घटनेनं परिसरात खळबळ माजलीये. मी माझ्या मर्जीने जीव देतेय, असं या महिलेनं हातावर लिहिल्याच आढळून आलं. तीन वर्षांपूर्वी या महिलेचं लग्न झालं होतं. ही महिला एका शाळेत गेस्ट लेक्चरर म्हणून काम करत होती.

नेमकं काय घडलं?

भोपाळच्या सुभाष साहू यांच्यासोबत तीन वर्षांपूर्वी इंदूचा विवाह झाला होता. इंदू एका सरकारी शाळेत तासिका तत्त्वावर शिक्षिका म्हणून का करत होत्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदू यांच्या पतीने आपल्या पत्नीने आत्महत्या केल्याची माहिती दिली होती. तिने गळफास घेतला, असं सुभाष यांनी पोलिसांनी कळवलं होतं. पण पोलिसांनी घरी दाखल होण्याआधीच इंदू यांचा मृतदेह खाली उतरवण्यात आला होता. पोलिसांनी आता हा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला असून त्याचा अहवाल कधी येतोय, याची पोलिसांनी प्रतीक्षा आहे.

हत्या की आत्महत्या?

दरम्यान, पोलिसांनी इंदूच्या मृतदेहाशेजारीत पती सुभाषचा एक फोटो सापडला. या फोटोच्या मागच्या बाजुला ‘मै बेवफा नहीं हू’ असं लिहिलेलं होतं. तर इंदूच्या हातावर सुसाईट नोट लिहिलेली होती. मृत इंदूच्या हातावर, मी माझ्या मर्जीने जीव देतेय. मम्मी, पप्पी, दादा, सॉरी. माझा मंगळच माझ्या जीव देण्याचं कारण ठरला, असं तिने लिहिल्याचं आढळंय. पोलिसांकडून आता इंदूच्या हातावरील हस्ताक्षरांचीही तपासणी करत आहेत.

हे सुद्धा वाचा

मुलीच्या नातलगांचे गंभीर आरोप

मृत इंदूच्या कुटुंबीयांनी तिच्या सासरच्या लोकांवर हत्येचा गंभीर आरोप केलाय. जावई आमच्या मुलीचा सतत छळ करत होता, असाही आरोपा मुलीच्या नातलगांकडून करण्यात आलाय. यानंतर दोन्ही कुटुंबात वादही झाला होता. दरम्यान, आत्महत्येच्या काही तास आधी मुलीनं आपल्या घरातल्या लोकांशी फोनवरुन बाचतीत केली होती. त्यावेळी सगळं ठीक असल्याचं या मुलीनं सांगितलं होतं. दरम्यान, या फोन कॉलनंतर अवघ्या काही तासांच्या अंतरानेच मुलीच्या आत्महत्येचं वृत्त समोर आलं. यानंतर मुलीच्या घरातल्यांनाही मोठा धक्का बसला होता.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.