13 महिन्यांपूर्वी जंगलात सापडलेल्या सांगाड्याचं गूढ उकललं, प्रायव्हेट पार्टवर वार करुन झालेली हत्या

एप्रिल 2021 मध्ये पोलिसांना जंगलात एक सांगाडा सापडल्याची माहिती मिळाली होती. मृताचा केवळ सांगाडा उरला होता, परंतु त्याच्या कपड्यांचे काही भाग शिल्लक होते, त्या आधारे त्याच्या मुलाने मृतदेहाची ओळख पटवली

13 महिन्यांपूर्वी जंगलात सापडलेल्या सांगाड्याचं गूढ उकललं, प्रायव्हेट पार्टवर वार करुन झालेली हत्या
13 महिन्यांनी हत्येचा उलगडाImage Credit source: ट्विटर
Follow us
| Updated on: May 20, 2022 | 8:18 AM

इंदौर : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh Blind Murder) इंदौरमधील बेटमा पोलीस ठाण्याच्या हद्दीत वर्षभरापूर्वी झालेल्या हत्येचा अखेर पोलिसांनी उलगडा (Indore Crime News) केला. या प्रकरणी पोलिसांनी हत्येच्या आरोपाखाली मृताच्या दोन मित्रांना अटक केली आहे. मृतदेह (Dead Body in Jungle) सापडल्यापासून प्रकरण उघडकीस येईपर्यंत तब्बल 13 महिने पोलिसांना संघर्ष करावा लागला.

काय आहे प्रकरण?

एप्रिल 2021 मध्ये पोलिसांना जंगलात एक सांगाडा सापडल्याची माहिती मिळाली होती. मृताचा केवळ सांगाडा उरला होता, परंतु त्याच्या कपड्यांचे काही भाग शिल्लक होते, त्या आधारे त्याच्या मुलाने मृतदेहाची ओळख पटवली. हे आपले वडील जंगम सिंग असल्याचे त्याने सांगितले. आता हा मृतदेह जंगम सिंगचा असल्याचे सिद्ध करण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते.

हे सुद्धा वाचा

डीएनए जुळला…

पोलिसांसाठी हे गवताच्या गंजीत सुई शोधण्याइतकेच आव्हानात्मक होते. तपासादरम्यान, पोलिसांनी जंगम सिंगच्या मुलाचा डीएनए नमुना घेतला आणि सांगाड्यातून सापडलेल्या डीएनए नमुन्यासह त्याची तपासणी केली. डीएनए नमुना जुळताच पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली.

13 महिन्यांनंतर आरोपींना अटक

यादरम्यान मृत व्यक्तीला त्याच्या दोन मित्रांसोबत शेवटचे पाहिले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीनंतर पोलिसांनी गेंदालाल आणि जगदीश या मित्रांच्या घरावर छापा टाकला असता, दोघेही बराच काळ गाव सोडून गेल्याचे समजले. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. मात्र, पाळत ठेवण्याबरोबरच इंदौरच्या आसपासच्या भागातही पोलीस आरोपींचा शोध घेत होते. अखेर 13 महिन्यांनंतर आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले.

दारु पिण्यावरुन वादावादी

चौकशीदरम्यान, दोन्ही आरोपींनी जंगम सिंगची हत्या केल्याची कबुली दिली आणि सांगितले की, घटनेच्या दिवशी ते दोघेही जंगम सिंगसोबत दारू पार्टी करण्यासाठी जंगलात गेले होते. त्याच वेळी दारू पिण्याच्या कारणावरून दोन्ही मित्रांशी त्याचा वाद झाला. त्यानंतर आरोपी गेंदालाल आणि जगदीश यांनी जंगम सिंगच्या प्रायव्हेट पार्टवर चाकूने वार केले आणि त्याची ओळख पटू नये म्हणून त्याच्या खिशातून ओळखपत्र काढून पळ काढला. यानंतर दोघेही गावातून पळून गेले होते.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.