AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : WWE मध्ये मारतात तसा 2 वर्षांच्या बाळाला हाणला! बाळ सांभाळण्यासाठी ठेवलेल्या महिलेचं हैवानी कृत्य

2 year old boy beaten : रजनी चौधरी नावाची कामवर ठेवलेली महिला या दोन वर्षांच्या बाळाला टॉर्चर करायची.

Video : WWE मध्ये मारतात तसा 2 वर्षांच्या बाळाला हाणला! बाळ सांभाळण्यासाठी ठेवलेल्या महिलेचं हैवानी कृत्य
धक्कादायक घटना..Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Jun 15, 2022 | 1:14 PM
Share

मध्य प्रदेशातील (MP Crime News) जबलपुरात भयंकर घटना घडली. एका महिलेनं दोन वर्षांच्या मुलाला अमानुष मारहाण केली. काळजाचा थरकाप उडवणारी ही मारहाण कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ही मारहाण दोन वर्षांच्या मुलानं सहन कशी केली असेल, असा प्रश्न समोर आलेल्या व्हिडीओतून (2 year boy beaten) उपस्थित होतोय. या मुलाच्या पोटात, पाठीत एकामागोमाग एक जोराचे बुक्के महिला मारताना दिसते. त्याच्या केस ओढून बाथरुममध्येही या महिलेनं नेल्यांच दिसून आलंय. धक्कादायक बाब म्हणजे या महिलेला मुलाचा सांभाळ करण्यासाठी नोकरीवर ठेवण्यात आलेलं होतं. पण तिनं केलेल्या निर्दयी आणि क्रूर कृत्यानं आई-वडिलांच्याही काळजाचा ठोका चुकवलाय. या मारहाणची सीसीटीव्ही (CCTV) समोर आलं असून त्यातील दृश्य विचलीत करणारी आहेत. मुलाची तब्बेत बिघडल्यानं आई-वडिलांनी घरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. त्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आलीय.

क्रूरतेचा कळस

जबरपूरच्या माढोताल पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. स्टार सिटीतील चमन नगरमध्ये एक कुटुंब राहतं. रजनी चौधरी या महिलेला बाळाचा सांभाळ करण्यासाठी नेमण्यात आलेलं. चार महिन्यांपूर्वी या बाळाच्या आईवडिलांनी तिला नोकरी दिली. नोकरी खातर पाच हजार रुपये पगारही ठरवण्यात आला. बाळाचे आई-वडील नोकरीवर गेल्यानंतर दोन वर्षांच्या या बाळाचा सांभाळ करण्यासाठी या महिलेला ठेवण्यात आलेलं.

या महिलेची नेमणूक करुन झाल्यानंतर आई वडील जेवण बनवून कामावर निघून जायचे. त्यानंतर रजनी चौधरी नावाची कामवर ठेवलेली महिला या दोन वर्षांच्या बाळाला टॉर्चर करायची. त्याचे केस ओढायची. त्याला मारहाण करायची. त्याच्या पोटात गुच्चे खालायची. थर्ड डिग्री टॉर्चरमुळे या मुलाची तब्बेत बिघडू लागली. त्यामुळे आई-वडिलांनी घरात काळजी खातर सीसीटीव्ही बसवले.

सीसीटीव्हीमुळे सत्य समोर

सीसीटीव्ही बसवल्यानंतर जे सत्य समोर आलं, ते सगळ्यांनाच घाबरवणारं होतं. रजनी चौधरी या नोकरीवर ठेवलेल्या महिलेचा क्रूर चेहरा सीसीटीव्हीनं उघडकीस आणला. हा मुलगा शांत शांत आणि घाबरलेला का असतो, यावरुन आई-वडिलांनी डॉक्टरांकडे चौकशी केली. डॉक्टरांनी मुलाची तपासणी केल्यानंतर त्याच्या पोटात सूज असल्याचं कळलं. त्याला मारलं जात असल्याचा संशय व्यक्त केला गेला. यानंतर सीसीटीव्हीतून जे दृश्य समोर आलं, त्याने आई-वडिलांच्या अंगावर काटा आणला होता. या घटनेचा व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा. 

याप्रकरणी पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी महिला रजनी चौधरीला बेड्या ठोकल्यात. कलम 308 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या महिलेनं असं कृत्य का केलं, याचा तपास पोलीस करत आहेत. अनेकदा पालक नोकरी-धंद्यामुळे घरात बाळाला सांभाळण्यासाठी बायकांना नोकरी देतात. कामाला ठेवतात. पण असं करण्यासाठी शंभर वेळा पडताळणी करुन घेणं, खात्री बाळगणं आणि खबरदारी घेणं गरजेचं असल्याचं या घटनेनं अधोरेखित केलंय.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.