DJ च्या दणदणाटाने जीव घेतला, वरातीत बेफाम डान्स, हार्ट अटॅकने तरुणाचा मृत्यू

उज्जैनजवळील अंबोडिया धरणावर राहणारा लाल सिंह (18) हा त्याचा मित्र विजय याच्या लग्नात सहभागी होण्यासाठी ताजपूरला आला होता. गावात विजयची मिरवणूक निघाली होती आणि मिरवणुकीत लालसिंग त्याच्या मित्रांसह डीजेच्या तालावर नाचत होता.

DJ च्या दणदणाटाने जीव घेतला, वरातीत बेफाम डान्स, हार्ट अटॅकने तरुणाचा मृत्यू
डीजेच्या तालावर नाचल्यानंतर तरुणाचा मृत्यूImage Credit source: आज तक
Follow us
| Updated on: May 07, 2022 | 12:50 PM

उज्जैन : मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये (Ujjain Madhya Pradesh) मिरवणुकीत वाजणाऱ्या डीजेच्या मोठ्या आवाजाने (Loud Music Death) एका तरुणाचा जीव घेतला. मिरवणुकीत डीजेच्या ठणाण्यात व्हिडीओ बनवत असताना हा तरुण जोरात खाली कोसळला, मात्र त्यानंतर तो पुन्हा उठू शकला नाही. डीजेच्या मोठ्या आवाजामुळे त्याला हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

काय आहे प्रकरण?

उज्जैनजवळील अंबोडिया धरणावर राहणारा लाल सिंह (18) हा त्याचा मित्र विजय याच्या लग्नात सहभागी होण्यासाठी ताजपूरला आला होता. गावात विजयची मिरवणूक निघाली होती आणि मिरवणुकीत लालसिंग त्याच्या मित्रांसह डीजेच्या तालावर नाचत होता.

नाचता-नाचता बेशुद्ध

यादरम्यान तो मोबाईलवर व्हिडिओही बनवत होता. त्यानंतर अचानक नाचत असताना लालसिंग बेशुद्ध होऊन जमिनीवर पडला. त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, तेथून त्याला उज्जैनला रेफर करण्यात आले. उज्जैनला पोहोचल्यावर डॉक्टरांनी लाल सिंह याला मृत घोषित केले.

हृदयात रक्ताची गुठळी

पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये लाल सिंह याच्या हृदयात रक्ताची गुठळी जमा झाल्याचे स्पष्ट झाले. डीजेच्या मोठ्या आवाजामुळे हा प्रकार घडल्याचे रुग्णालयाचे डॉक्टर जितेंद्र शर्मा यांनी सांगितले.

डॉक्टरांचं म्हणणं काय

डॉक्टरांनी सांगितले की, डीजे किंवा इतर मोठ्या साउंड सिस्टीममधून मोठ्या आवाजात संगीत वाजवले जाते तेव्हा शरीरात असामान्य हालचाली निर्माण होतात. निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त डेसिबल असलेला आवाज मानवी शरीरासाठी हानिकारक आहे. त्याचा परिणाम हृदय आणि मन या दोन्हींवर होऊ शकतो.

संबंधित बातम्या :

Breaking : Solapur Breaking : पोहोता पोहोता थकले अन् मृत्यूनं गाठलं, सोलापुरात सरकार डॉक्टरचा करुण अंत

Nanded accident | नांदेडमध्ये खासगी गाडीच्या धडकेत गरोदर महिला ठार; दोन जण जखमी

Bhandara Accident: अज्ञात टिप्परने दुचकिला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू तर एक गंभीर जखमी

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.