Suicide | मध्य प्रदेशातील मंत्र्यांच्या सुनेची राहत्या घरी आत्महत्या, 22 व्या वर्षी आयुष्य संपवलं
मध्य प्रदेशचे शालेय शिक्षण मंत्री इंदर सिंह परमार यांच्या सूनेचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. सविता परमार राहत्या घरी मृतावस्थेत आढळली. मंगळवारी शाजपूर जिल्ह्यातील आपल्या निवासस्थानी ती गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली
भोपाळ : कॅबिनेट मंत्र्याच्या सूनबाईंचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मध्य प्रदेशात (Madhya Pradesh Crime News) हा प्रकार समोर आला आहे. मध्य प्रदेश राज्य सरकारमधील शालेय शिक्षण मंत्र्यांच्या सूनेने आत्महत्या केल्याचा आरोप केला जात आहे. इंदर सिंह परमार (Inder Singh Parmar) यांच्या मुलाच्या बायकोने आपल्या आयुष्याची अखेर केल्याचा दावा केला जात आहे. परमार यांची सून सविता परमार राहत्या घरी मृतावस्थेत आढळली आहे. मंगळवारी ती निवासस्थानी गळफास घेतलेल्या (Suicide) अवस्थेत सापडली. मध्य प्रदेशातील शाजपूर जिल्ह्यात ही घटना घडली.
पाहा एएनआयचे ट्वीट :
Madhya Pradesh Minister Inder Singh Parmar’s daughter-in-law was found hanging at their residence in Shajapur. The body is being sent for postmortem this morning. Details awaited.
हे सुद्धा वाचा— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) May 11, 2022
मध्य प्रदेशचे शालेय शिक्षण मंत्री इंदर सिंह परमार यांच्या सूनेचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. सविता परमार राहत्या घरी मृतावस्थेत आढळली. मंगळवारी शाजपूर जिल्ह्यातील आपल्या निवासस्थानी ती गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. तिने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. एएनआय वृत्तसंस्थेने याविषयी माहिती दिली आहे.
“कौटुंबिक कारणा”मुळे सविता परमार हिने आपली जीवनयात्रा संपवल्याचा आरोप केला जात आहे, मात्र पोलिसांनी अद्याप कुठल्याही गोष्टीला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. मयत सविता परमार अवघ्या 22 वर्षांची होती. तिचा विवाह तीन वर्षांपूर्वी इंदर सिंह परमार यांचा मुलगा देवराज सिंग याच्याशी झाला होता.
आज सकाळी सविताचा मृतदेह फॉरेन्सिक चाचणीसाठी पाठवण्यात आला असून शव विच्छेदन अहवालाची प्रतीक्षा केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.