पत्नीची ती गोष्ट खटकली, मग पतीने जे केले त्याने सर्वच हैराण झाले, काय आहे प्रकरण?

पती-पत्नीचे एकमेकांशी पटत नव्हते. त्यामुळे सहा महिन्यांपूर्वी दोघांनी घटस्फोट घेतला. मात्र पतीला हा घटस्फोट जिव्हारी लागला. मग त्याने जे केले ते त्याने सर्वच हादरले.

पत्नीची ती गोष्ट खटकली, मग पतीने जे केले त्याने सर्वच हैराण झाले, काय आहे प्रकरण?
घटस्फोट घेतल्याच्या रागातून पतीने पत्नीला संपवले
Follow us
| Updated on: Jun 05, 2023 | 4:19 PM

ग्वाल्हेर : मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घटस्फोट घेतल्याचा राग मनात धरुन पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या जोडप्याचा सहा महिन्यांपूर्वी घटस्फोट झाला होता. याचा राग येऊन आरोपीने त्याचवेळी पत्नीला जीवे मारण्याची धमकी दिली होती. आरोपीच्या मोठ्या मुलाच्या तक्रारीवरून ग्वाल्हेरच्या जनक गंज पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पनीहार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगलातून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. सध्या आरोपी महिलेच्या लहान मुलासह फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. हत्या केल्यानंतर आरोपींनी मृतदेह खड्ड्यात उलटा लटकवला होता. शरीरावर जखमेच्या खुणा आढळून आल्या आहेत. यावरून महिलेवर अत्याचार झाल्याचे दिसून येते.

सहा महिन्यांपूर्वीच घटस्फोट झाला होता

पोलिसांच्या प्राथमिक तपासात असे निष्पन्न झाले आहे की, ग्वाल्हेरच्या गोल पहारिया भागात राहणारी राणी जाटव हिचा पहिला विवाह गोहड भिंड येथील एका तरुणाशी झाला होता. मात्र त्यांचे नाते चार वर्षेच टिकले आणि नंतर दोघांनी घटस्फोट घेत वेगळे झाले. राणीला पहिल्या पतीपासून दोन मुले आहेत. यानंतर राणीने वर्षभरापूर्वी विजय सिंह निधारशी लग्न केले. परंतु दुसऱ्या पतीशी तिचे पटत नसल्याने त्यांनी सहा महिन्यांतच विजयलाही घटस्फोट दिला. मात्र या घटस्फोटाचा राग आल्याने विजय सिंह चांगलाच चिडला आणि त्याने राणीला जीवे मारण्याची धमकी दिली होती.

पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु

राणी आपल्या छोट्या मुलासोबत शुक्रवारी संध्याकाळी कुठेतरी चालली होती. यादरम्यान विजय सिंह त्याच्या तीन साथीदारांसह व्हॅनमध्ये आला आणि दोघांचे अपहरण केले. घटनास्थळी उपस्थित लोकांनी तातडीने पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असता, राणीचा मृतदेह पनीहार परिसरातील जंगलातून सापडला. मात्र राणीचा मुलगा मृतदेहाजवळ सापडला नाही. तसेच तिच्या पतीचा सुगावा अद्याप लागलेला नाही. आरोपीकडून मुलालाी धोका असल्याने पोलीस आरोपीचा कसून शोध घेत आहेत.

हे सुद्धा वाचा

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.