आई-बाबा सॉरी, मी कणखर नाही, आता ताण सहन होत नाहीये, डॉक्टरनेच लिहून ठेवलं अन्….

पोलिसांनी अधिक तपास केला असता तिच्या खोलीत सदर आशय असलेली चिठ्ठी सापडली.

आई-बाबा सॉरी, मी कणखर नाही, आता ताण सहन होत नाहीये, डॉक्टरनेच लिहून ठेवलं अन्….
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Jan 05, 2023 | 11:30 AM

भोपाळः एवढा ताण (Stress) सहन करण्याएवढी मी कणखर नाही. आई-बाबा सॉरी. मित्र-मैत्रिणींचीही माफी मागते. तुम्ही मला प्रेम दिलं, त्यासाठी मी खूप आभारी आहे. माझ्या काही वैयक्तिक कारणांमुळे मी हे पाऊल उचलतेय…. अशा आशयाची चिठ्ठी लिहून एका डॉक्टरनेच आत्महत्येसारखं (Suicide) टोकाचं पाऊल उचलल्याची घटना घडली आहे. ज्युनियर डॉक्टर आकांक्षा माहेश्वरीच्या आत्महत्येनं विद्यार्थी वर्गात तसेच भोपाळ (Bhopal) शहरात हळहळ व्यक्त केली जातेय.

भोपाळच्या गांधी मेडिकल कॉलेजमध्ये आकांक्षा माहेश्वरी या ज्युनियर डॉक्टरने होस्टेलच्या खोलीतच बुधवारी आत्महत्या केल्याचं एका वेबसाइटच्या वृत्तात म्हटलं आहे. आकांक्षा ही गांधी मेडिकल कॉलेजमधून पीडियाट्रिक डिपार्टमेंटमध्ये पीजी करत होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकांक्ष बुधवारी सकाळी तिच्या खोलीतच होती. संध्याकाळपर्यंत तिचा दरवाजा बंदच होता. त्यानंतर शेजारच्या मुलींनी होस्टेलच्या वॉर्डनना ही माहिती दिली.

खूप वेळ दरवाजा वाजवूनही आकांक्षाने दार उघडलं नाही. अखेर पोलिसांना ही माहिती कळवण्यात आली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

दरवाजा उघडताच खोलीतील बेडवर आकांक्षा बेशुद्धावस्थेत दिसून आली. पुढील तपासणी केली असता तिचे प्राण गेल्याचं समोर आलं.

आकांक्षाच्या खोलीत बेशुद्धीच्या औषधाचे इंजेक्शन मिळाले. या औषधांच्या ओव्हरडोसमुळेच तिचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय.

पोलिसांनी अधिक तपास केला असता तिच्या खोलीत सदर आशय असलेली चिठ्ठी सापडली.आकांक्षाने चिठ्ठीत लिहिलं… मी एवढी कणखर नाही. आता यापुढे मला फार ताण सहन होत नाहीये. आई-बाबा सॉरी. मित्र-मैत्रिणींनीही मला माफ करावं. तुम्ही सर्वांनी मला खूप प्रेम दिलं. पण वैयक्तिक कारणांमुळे हे आज हे  पाऊल उचलतेय. मी स्ट्राँग नाहीये….

आकांक्षा माहेश्वरी ही ग्वाल्हेरची राहणारी होती. गजराजा मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेतल्यानंतर ती भोपाळच्या गांधी मेडिकल कॉलेजमधून पीडियाट्रिक डिपार्टमेंटमध्ये पीजी करत होती. पोलिस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.