9 जण जिवंत जळाले! चंद्रपुरात ट्रक अपघातानंतर लागलेल्या आगीतील मृतांचा आकडा वाढला

मूल-चंद्रपूर अग्निशमन पथकांनी आग विझवली. आगीमुळे मृतदेह जळल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलीस तपास सुरू आहे.

9 जण जिवंत जळाले! चंद्रपुरात ट्रक अपघातानंतर लागलेल्या आगीतील मृतांचा आकडा वाढला
दोन ट्रकच्या धडकेत आग भडकून अपघातImage Credit source: टीव्ही 9
Follow us
| Updated on: May 20, 2022 | 11:37 AM

चंद्रपूर : चंद्रपूर-मूल मार्गावर अजयपूर येथे झालेल्या अपघातातील (Chandrapur Accident) मृतांचा आकडा वाढला आहे. 9 जणांचा मृत्यू झाल्याचं निश्चित झालं आहे. अजयपूर गावाजवळ काल (गुरुवारी) रात्री पेट्रोल टँकर आणि ट्रकमध्ये भीषण अपघात (Truck Accident) झाला होता. समोरासमोर धडक होऊन अपघातानंतर भीषण आग (Fire) लागली होती. आग लागल्याने ट्रकचे टायर फुटून आग भडकली होती. मूल-चंद्रपूर अग्निशमन पथकांनी सकाळपर्यंत आग विझवली, मात्र आगीमुळे मृतदेहांची राख झाल्याची विदारक दृश्ये पाहायला मिळाली.

पेट्रोलची वाहतूक करणाऱ्या टँकरमधील चालक-वाचकांचा मृतात समावेश आहे. तर लाकूड भरलेल्या ट्रकमधील 7 जणांचा कोळसा झाला. ट्रकमधील 7 जण बल्लारपूर तालुक्यातील नवी दहेली आणि कोठारी गावचे रहिवासी असल्याची माहिती आहे. अपघात नेमका कसा झाला याबाबत तपास सुरु आहे.

हे सुद्धा वाचा

नेमकं काय घडलं?

चंद्रपूर शहरालगत मूल मार्गावरच्या अजयपूर गावाजवळ 2 ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. अपघातानंतर भीषण आग लागली होती. आग लागल्याने ट्रकचे टायर फुटून ही आग आणखी भडकली होती.

जंगलातील झाडेही आगीच्या विळख्यात

संपूर्ण रस्ताभर आग पसरल्याने वाहतूक खंडित झाली होती. आगीच्या उंच ज्वाळांनी लगतच्या जंगलातील झाडेही आगीच्या विळख्यात सापडली. मूल-चंद्रपूर येथून अग्निशमन पथके आग विझवण्यासाठी, तर मूल-रामनगर पोलिसांची पथके घटनास्थळी दाखल झाली होती. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.

महामार्गावर वाहतूक खंडित

महामार्गाच्या दोन्ही बाजूस वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होती. एका ट्रकमध्ये पेट्रोल, तर दुसऱ्यामध्ये लाकूड असल्याने आग भडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या अपघातात दोन्ही वाहनांमधील एकूण नऊ जणांना प्राण गमवावे लागले. मात्र अद्याप मृतदेहांची ओळख पटलेली नाही. या प्रकरणी अधिक पोलीस तपास सुरू आहे.

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.