Manmad Accident | कार्यक्रमाहून परतताना कार झाडावर आदळली, नाशकात चौघा मित्रांचा करुण अंत

पाचही मित्र कार्यक्रमासाठी येवल्याकडे गेले होते. परत येताना मनमाडच्या दिशेने जात असतानाच चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळली.

Manmad Accident | कार्यक्रमाहून परतताना कार झाडावर आदळली, नाशकात चौघा मित्रांचा करुण अंत
नाशकात भीषण अपघातImage Credit source: टीव्ही 9
Follow us
| Updated on: May 11, 2022 | 7:57 AM

मनमाड : झाडावर कार आदळून भीषण अपघात (Nashik Accident) झाल्याची घटना समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यात मनमाडजवळ हा अपघात झाला. या अपघातात कारमधून प्रवास करणाऱ्या चौघा मित्रांवर काळाने घाला (Four Friends Death) घातला, तर पाचवा मित्र गंभीर जखमी झाला आहे. पुणे-इंदोर महामार्गावर (Pune Indore Highway) अंकाई किल्ल्याच्या बाजूने मानामडच्या दिशेने येत असताना हा अपघात झाला. कार झाडावर आपटल्यामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या अपघातात चौघा जणांना जागीच प्राण गमवावे लागले, तर पाचव्या प्रवाशाची प्रकृती गंभीर आहे. त्याला उपचारासाठी मनामडच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मनमाडला येताना अपघात

नाशिक जिल्ह्यात मनमाडजवळ झाडावर कार आदळून भीषण अपघात झाला. पुणे-इंदोर महामार्गावर अंकाई किल्ल्याच्या बाजूने मानामडच्या दिशेने येत असताना हा अपघात झाला.

नेमकं काय घडलं?

पाचही मित्र कार्यक्रमासाठी येवल्याकडे गेले होते. परत येताना चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळली.  कारने झाडाला दिलेली धडक इतकी भीषण होती, की गाडीतून प्रवास करणारे पाचपैकी चौघे जागीच मृत्युमुखी पडले.

चौघे जागीच गतप्राण, पाचवा मित्र गंभीर

तौफिक शेख, दिनेश भालेराव, प्रवीण सकट, गोकुळ हिरे या चौघांचा जागीच मृत्यू झाला तर अजय वानखेडे हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.