CRIME NEWS : तीन वर्षीय चिमुकल्या मुलाला जमिनीवर आपटून ठार मारण्याचा प्रयत्न, आईन सांगितला संतापजनक प्रकार

BHANDARA CRIME NEWS : एक संपाजनक घटना घडली आहे. दारुड्या बापाने आपल्या मुलाला संपवण्याचा प्रयत्न केला असल्याची तक्रार आईने पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली आहे. गंभीर मुलगा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला आहे.

CRIME NEWS : तीन वर्षीय चिमुकल्या मुलाला जमिनीवर आपटून ठार मारण्याचा प्रयत्न, आईन सांगितला संतापजनक प्रकार
CRIME NEWS (1)Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 14, 2023 | 8:03 AM

भंडारा : महाराष्ट्रात काही अशा क्राईमच्या (MAHARASHTRA CRIME NEWS) घटना घडत असतात की, त्यामुळे लोकांना धक्का बसतो. काल सुध्दा असाच एक प्रकार भंडारा जिल्ह्यात (BHANDARA NEWS IN MARATHI) घडला आहे. त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील अनेक जागृत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. त्याचबरोबर अशा नराधम बापाला कठोर शिक्षा करावी अशी मागणी केली आहे. एका बापाने आपल्या मुलाला जमिनीवर जोरात आपटून ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. त्यावेळी तिथं असलेल्या आईनं कसं बसं बाळाला सोडवलं आणि हॉस्पिटल गाठलं आहे. त्याचबरोबर संतापलेल्या आईनं हा प्रकार पोलिस स्टेशनमध्ये (BHANDARA POLICE) सुध्दा सांगितला. त्यानंतर पोलिसांनी त्या मुलाच्या बापाला ताब्यात घेतलं आहे.

आईच्या मांडीवर खेळत असलेल्या तीन वर्षाच्या मुलाला दारुड्या बापानं ओढत नेत जमिनीवर आपटून ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातील विरली या गावात घडली आहे. याप्रकरणी लाखांदूर पोलिसांनी आरोपी राजेंद्र गायधने या बापाला अटक केली अशी माहिती पोलिसांनी सांगितली आहे.

विरली या गावात तक्रारदार महिला आपल्या पतीसोबत राहते. राजेंद्र गायधने असं त्यांच्या पतीचं नाव आहे. राजेंद्र गायधने याला मद्यप्राशन करण्याची सवय आहे. काल तो नेहमीप्रमाणे दारू पिऊन घरी आला. त्यावेळी त्याचा आथर्व मुलगा त्याच्या आईच्या मांडीवर बसला होता. दारु पिलेल्या राजेंद्र गायधने यांनी आपल्या मुलाला हातात उचलून घेतलं आणि जमिनीवर जोरात आपटले. त्यानंतर त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे.

हे सुद्धा वाचा

तिथं असलेल्या आईने आपल्या मुलाची बापाच्या तावडीतून सुटका केली. त्याचबरोबर उपचारासाठी लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात मुलाला दाखल केलं. त्यावेळी मुलाची प्रकृती नाजूक असल्यामुळं पुढील उपचारासाठी बाळाला भंडारा इथल्या लक्ष हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. आता त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. लाखांदूर पोलिसांनी आरोपी बापाविरुद्ध गुन्हा करुन त्याला अटक केली आहे.

'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.