Video : प्रवाशांची नजर चुकवायच्या, मौल्यवान वस्तू लंपास करायच्या, 7 महिलांची टोळी पोलिसांकडून जेरबंद

चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूर पोलिसांनी बस प्रवास करणाऱ्या महिलांच्या दागिने आणि पर्स लंपास करणाऱ्या एका टोळीला गजाआड केले आहे. या महिला मूळच्या नागपूर येथील रहिवासी असून जिल्हाभरात यासाठीच बसने प्रवास करत असतात आणि संधीचा फायदा घेत प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू लंपास करतात.

Video : प्रवाशांची नजर चुकवायच्या, मौल्यवान वस्तू लंपास करायच्या, 7 महिलांची टोळी पोलिसांकडून जेरबंद
प्रवाशांची नजर चुकवायच्या, मौल्यवान वस्तू लंपास करायच्या, 7 महिलांची टोळी पोलिसांकडून जेरबंद
Follow us
| Updated on: Nov 12, 2021 | 10:07 AM

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूर पोलिसांनी बस प्रवास करणाऱ्या महिलांच्या दागिने आणि पर्स लंपास करणाऱ्या एका टोळीला गजाआड केले आहे. या महिला मूळच्या नागपूर येथील रहिवासी असून जिल्हाभरात यासाठीच बसने प्रवास करत असतात आणि संधीचा फायदा घेत प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू लंपास करतात. अशाच  प्रकारच्या घटनेचा  बल्लारपूर पोलिसांनी उलगडा केला आहे.

लातूर येथील दयानंद उपासे आपल्या पत्नीसह बसप्रवास करत होते. चंद्रपूरच्या बंगाली येथून तेलंगणाकडे जाणाऱ्या बसमध्ये ते चढले. त्यांच्या पत्नीच्या बाजूला एक महिला बाळासह बसली. उपासे यांची पत्नी फोनवर व्यस्त असतानाची संधी साधून ही आरोपी महिला दागिन्याचा डबा आणि पर्स लंपास करून बल्लारपूर स्थानकावर उतरले. उपासे यांच्या हे लक्षात येताच त्यांनी लगेच बल्लारपूर पोलीस स्टेशन गाठलं.

7 महिलांची टोळी पोलिसांकडून जेरबंद

तक्रारीनंतर बल्लारपूर पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवले आणि चंद्रपूर येथून एका महिलेला पकडले. चौकशी केल्यानंतर गुन्हा निष्पन्न झाला. आणि यात चक्क सात महिलांना ताब्यात घेण्यात आले.

याचाच धागा घेतल्यावर नागपूर येथील घराचीही झाडाझडती घेतली तेव्हा आणखी काही ठिकाणचा मुद्देमाल आढळला.एकूण साडेचार लाखाचा मुद्देमाल या महिलांकडून जप्त झाला असून आरोपींना न्यायालयात सादर करून पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. यासोबतच अन्य ठिकाणच्या याच पद्धतीने झालेल्या चोरीच्या घटना उलगडण्याची शक्यता आहे.

(maharashtra Chandrapur Crime news a gang of women was arrested for stealing jewelery and purses from a bus)

हे ही वाचा :

भोसरी पोलीस स्थानकात किरण गोसावी विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल; परदेशात नोकरी देण्याच्या बहाण्याने घातला लाखोंना गंडा

मित्राचा वाढदिवस साजरा करुन घरी परतणाऱ्या 3 तरुणांचा अपघात, डंपरच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू

नांदेडच्या सरकारी दवाखान्यात चोरट्यांचा डल्ला, 3 लाखांची मशीन पळवली, सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.