‘फास्टट्रॅक’ शब्द कायद्यातच नाही? ही संकल्पना राजकीय परवलीचा शब्द, अ‍ॅड. असीम सरोदेंचा खुलासा

फास्ट ट्रॅक ही संकल्पना राजकीय परवलीचा शब्द झाला असून न्याय हा विरुन गेल्याचं सरोदे यांनी म्हटलं आहे. आपण जो फास्ट ट्रॅक नावाचा बुडबुडा तयार केलाय, त्यात न्यायाची प्रक्रिया हरवून बसल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

'फास्टट्रॅक' शब्द कायद्यातच नाही? ही संकल्पना राजकीय परवलीचा शब्द, अ‍ॅड. असीम सरोदेंचा खुलासा
उपहार आग प्रकरणात पुराव्याशी छेडछाड केल्याप्रकरणी अंसल बंधूंना सात वर्षांची शिक्षा
Follow us
| Updated on: Sep 15, 2021 | 11:48 AM

अहमदनगर : विधीज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते असीम सरोदे यांनी फास्टट्रॅक कोर्टाबद्दल आपले स्पष्ट मत मांडले आहे. फास्ट ट्रॅक या संकल्पनेच्या बद्दल देशात आणि राज्यात मोठा गैरसमज असल्याचं सरोदे म्हणाले. फास्ट ट्रॅक असा कुठलाही शब्द कायद्यामध्ये नसून फास्ट ट्रॅकची प्रक्रिया काय आहे, हे कुठेही सांगितले नाही. तसेच कोणाला जलद गतीने तर कोणाला कमी जलद गतीने न्याय द्यायचा, असं कुठलीही न्यायाचं तत्त्व नसल्याचं मत असीम सरोदे यांनी व्यक्त केलं आहे.

फास्ट ट्रॅक ही संकल्पना राजकीय परवलीचा शब्द झाला असून न्याय हा विरुन गेल्याचं सरोदे यांनी म्हटलं आहे. आपण जो फास्ट ट्रॅक नावाचा बुडबुडा तयार केलाय, त्यात न्यायाची प्रक्रिया हरवून बसल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

कायद्यात फास्ट ट्रॅक ही संकल्पना नाही

फास्ट ट्रॅक हा कायद्यामध्ये कुठलाही शब्द नसून फास्ट ट्रॅकची प्रक्रिया काय आहे, हे कुठेही सांगितले नाही, असा खुलासाच त्यांनी केला. तर फास्ट ट्रॅकच्या मृगजळाच्या मागे धावण्यापेक्षा आपण विशेष न्यायालयाची संकल्पना अधिक प्रभावीपणे केली पाहिजे, असं स्पष्ट मत सरोदेंनी मांडलं. विशेष न्यायालयात केस लढण्यापेक्षा आपण फास्टट्रॅक कोर्टाच्या मागे लागलो हे चुकीचं असल्याचं असीम सरोदे यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्र दोन नंबरला

तसेच फास्टट्रॅक कोर्टात प्रलंबित केसेसमध्ये उत्तर प्रदेश एक नंबर, तर महाराष्ट्र दोन नंबरला असल्याचं त्यांनी सांगितले. तर भारतात 1 लाख 63 हजार केसेस प्रलंबित असून इतक्या केसेस प्रलंबित राहत असतील, तर त्याचा उपयोग काय असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.

“फास्ट ट्रॅक कोर्टाच्या खर्चाचे तपशील द्या”

त्याचबरोबर सर्व केसेस मूल्यांकन झाले पाहिजे तर त्या मूल्यांकनाचा अभ्यास होऊन ते जाहीर पब्लिश झाली पाहिजे तसेच लोकांना कळलं पाहिजे फास्ट ट्रॅक कोर्टात किती खर्च झाला, त्यातून न्याय किती जणांना मिळाला, अन्यथा हे कोर्ट लोकांची फसवणूक आहे असं त्याचं चित्र निर्माण होईल अशी प्रतिक्रिया सरोदे यांनी दिली.

साकीनाका बलात्कार प्रकरण

मुंबईतील साकीनाका (Saki Naka) परिसरात झालेल्या बलात्कार (Rape) पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल, असं आश्वासन देताना, फास्ट ट्रॅकवर खटला चालवण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भातील खटला फास्ट ट्रॅकवर चालवून पीडितेला न्याय मिळवून दिला जाईल असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी तातडीने तपासाला गती देण्याचे निर्देश दिल्याचेही सांगितले.

संबंधित बातम्या 

आरोपीला 10 दिवसांची कोठडी, मुख्यमंत्री म्हणाले, सोडणार नाही, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार!

आतडे कापले, प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकला, साकीनाका पीडितेच्या मृत्यूनंतर चित्रा वाघ हमसून हमसून रडल्या

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.