विवाहित प्रेयसीसोबत नगरहून कोल्हापूर गाठलं, धर्मशाळेत प्रेमी युगुलाचा गळफास, चार आयुष्यं उद्ध्वस्त

कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिराजवळ एका धर्मशाळेत दोघांनी गळफास घेऊन आयुष्याची अखेर केली. दोघांच्या मृतदेहाजवळ चिठ्ठी सापडल्यामुळे या प्रकरणाचा उलगडा झाला.

विवाहित प्रेयसीसोबत नगरहून कोल्हापूर गाठलं, धर्मशाळेत प्रेमी युगुलाचा गळफास, चार आयुष्यं उद्ध्वस्त
डॉ. रेखा कदम यांच्या घराची झडती, काळवीटाचे कातडे जप्त
Follow us
| Updated on: Jan 04, 2022 | 1:01 PM

कोल्हापूर : अहमदनगर जिल्ह्यातील प्रेमी युगुलाने कोल्हापुरात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रेमसंबंधांना विरोध केल्याने त्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे तरुणीचं लग्न झालं असून तिला मुलगाही असल्याची माहिती आहे. राहुल मच्छे आणि प्रियंका भराडे अशी आत्महत्या करणाऱ्या प्रेमी युगुलाची नावं आहेत.

कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिराजवळ एका धर्मशाळेत दोघांनी गळफास घेऊन आयुष्याची अखेर केली. दोघांच्या मृतदेहाजवळ चिठ्ठी सापडल्यामुळे या प्रकरणाचा उलगडा झाला. दोघांच्या आत्महत्येमुळे प्रियकर, विवाहित प्रेयसी, तिचा पती आणि मुलगा अशी चौघांची आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचं बोललं जात आहे.

काय आहे प्रकरण?

अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील तामसवाडी भागात राहणारं प्रेमी युगुल 31 डिसेंबरला कोल्हापुरात आलं होतं. कोल्हापुरात देव दर्शनासाठी आलो असून दोन दिवस राहणार असल्याचं त्यांनी धर्मशाळेच्या व्यवस्थापकांना दिल्याचं वृत्त ‘मुंबई तक’ वेबसाईटने दिलं आहे.

नगरहून कोल्हापूर गाठलं

दोन दिवस उलटल्यानंतरही दोघं रुमबाहेरच आले नसल्याने 3 डिसेंबरला व्यवस्थापकांनी दोघं राहत असलेल्या रुमचे दार ठोठावले. पण बराच वेळ प्रतिसाद न आल्यामुळे त्यांना संशय आला. त्यामुळे त्यांनी पोलिसांना फोन केला. पोलिसांनी तात्काळ धर्मशाळेत धाव घेत खोलीचा दरवाजा उघडला. त्यावेळी दोघंही गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. तर बेडवर एक सुसाईड नोट सापडली.

चार वर्षांपासून प्रेमसंबंध

राहुल मच्छे आणि प्रियांका भराडे हे दोघेही एकाच गावात राहत होते. गेल्या चार वर्षांपासून दोघांचे प्रेमसंबंध होते. मात्र प्रियांकाचा विवाह तीन वर्षांपूर्वी गावातीलत एका तरुणासोबत तिच्या कुटुंबीयांनी मनाविरुद्ध लावून दिला. प्रियांकाला एक वर्षांचा मुलगाही आहे. त्यानंतरही दोघांचे प्रेमसंबंध सुरुच होते. अखेर नगरहून थेट कोल्हापूर गाठून दोघांनी आत्महत्या केली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

संबंधित बातम्या :

25 वर्षीय युवतीची डोक्यात दगड घालून हत्या, ऊसाच्या शेतात मृतदेह आढळला

वासनांध वृद्धाचा कुत्र्यावर बलात्कार, व्हिडीओ शूट करणाऱ्या सुनेवर नजर पडताच…

कळमेश्वरमध्ये घरगुती वाद गेला विकोपाला; बहिणीला का संपविले भावानेच?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.