अहमदनगरमधील शिवसैनिकांची दुहेरी हत्या, कर्डिलेंची कन्या सुवर्णा कोतकरांना अटकपूर्व जामीन

केडगावातील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडाचा कट रचून त्याची अंमलबजावणी केल्याचा आरोप सुवर्णा कोतकरांवर आहे. अहमदनगर जिल्हा न्यायालयाने त्यांना अटी-शर्थींसह जामीन मंजूर केला आहे.

अहमदनगरमधील शिवसैनिकांची दुहेरी हत्या, कर्डिलेंची कन्या सुवर्णा कोतकरांना अटकपूर्व जामीन
(डावीकडून) मयत शिवसैनिक संजय कोतकर आणि वसंत ठुबे, उजवीकडे आरोपी सुवर्णा कोतकर
Follow us
| Updated on: Jan 13, 2022 | 4:59 PM

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील केडगाव येथील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांड (Ahmedngar Kedgaon Double Murder) प्रकरणात फरार असलेल्या माजी उपमहापौरांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. आरोपी सुवर्णा कोतकर (Suvarna Kotkar) यांना अहमदनगर जिल्हा न्यायालयाने अटी-शर्थींसह जामीन मंजूर केला आहे. एप्रिल 2018 मध्ये केडगाव उपनगरात शिवसेनेचे (Shiv Sena) उपशहरप्रमुख संजय कोतकर आणि विभागप्रमुख वसंत ठुबे या दोघांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. दोघांवर गोळ्या झाडून हल्लेखोरांनी कोयत्याने सपासप वार केले होते. तत्कालीन अहमदनगर महापालिका पोटनिवडणुकीवरुन दोघा शिवसैनिकांची हत्या झाल्याचा आरोप होता. दुहेरी हत्याकांडात नाव आल्यापासून सुवर्णा कोतकर फरार होत्या.

सशर्त जामीन मंजूर

केडगावातील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडाचा कट रचून त्याची अंमलबजावणी केल्याचा आरोप सुवर्णा कोतकरांवर आहे. अहमदनगर जिल्हा न्यायालयाने त्यांना अटी-शर्थींसह जामीन मंजूर केला आहे. महाराष्ट्र सोडायचा असल्यास परवानगी घ्यावी, पासपोर्ट जमा करावा, या अटींवर न्यायालयाने एक लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. सुवर्णा कोतकर या भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या ज्येष्ठ कन्या, तर माजी महापौर संदीप कोतकर यांची पत्नी आहेत.

यापूर्वीही त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र तो फेटाळण्यात आला होता. दोन जानेवारीला पुन्हा त्यांनी जिल्हा आणि सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर सीआयडी आणि सरकारी वकिलांनी म्हणणे मांडले असता मंगळवारी या प्रकरणाची सुनावणी झाली होती. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर सुवर्णा कोतकर यांना सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

अहमदनगर महापालिकेच्या पोटनिवडणुकीनंतर 7 एप्रिल 2018 रोजी केडगाव मधील शाहूनगर परिसरात शिवसेना पदाधिकारी संजय कोतकर आणि शिवसैनिक वसंत ठुबे या दोघांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. कोतवाली पोलीस ठाण्यात या प्रकरणी 32 जणांवर खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. यापैकी आठ जणांना पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणाचा तपास सीआयडी करत होती. माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर यांच्यासह संदीप कोतकर, औदुंबर कोतकर या दोघा आरोपींचाही गुन्ह्यात सहभाग असल्याचं तपासात समोर आलं होतं.

मयत शिवसैनिकाच्या मुलाचा आरोप काय

भानुदास कोतकर यांचा मुलगा संदीप कोतकर यांना हत्या प्रकरणात शिक्षा झाल्याने पोटनिवडणूक लागली होती. “पोटनिवडणुकीत शिवसैनिकांनी जोमाने प्रचार केला होता. पोटनिवडणुकीत संदीप कोतकरच्या चुलत भावाने विजय मिळवला. मात्र, त्यांना अपेक्षित यश मिळालं नाही. याचा बदला घेण्यासाठी माझ्या वडिलांची आणि वसंत ठुबे यांची हत्या करण्यात आली, असा आरोप मयत संजय कोतकर यांच्या मुलाने त्यावेळी केला होता.

संबंधित बातम्या :

लघुशंकेला उतरलेल्या तिघांना ट्रेलरने उडवलं, एकाचा जागीच मृत्यू, ठाण्याच्या तरुणांची मालवण ट्रीप अधुरी

हत्येच्या गुन्ह्यात जामिनावर बाहेर, 22 वर्षीय तरुणासह बापालाही संपवलं, पुण्यातील शाळेमागे हत्याकांड

‘आब्या’मुळे आत्महत्या करतेय, छेडछाडीला कंटाळून पुण्यात नववीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.