AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | काम का देत नाही? प्रश्न विचारणाऱ्या कामगाराला कंपनी मालकाकडून चोप

'काम का देत नाही?' असं विचारायला गेलेल्या कामगाराला मालकाने मारहाण केल्याचा आरोप होत आहे. राजू फकिरचंद हिरेकर असं मारहाण झालेल्या कामगाराचे नाव आहे, तर मुकेश शरावत असं मारहाण करणाऱ्या कंपनी मालकाचे नाव आहे.

VIDEO | काम का देत नाही? प्रश्न विचारणाऱ्या कामगाराला कंपनी मालकाकडून चोप
कंपनी मालकाने मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर
| Edited By: | Updated on: Aug 18, 2021 | 9:36 AM
Share

औरंगाबाद : उद्योग जगतातील गुंडगिरीनंतर आता उद्योजकांच्या दादागिरीचे प्रकरण समोर आले आहे. उद्योगपतीनेच कामगाराला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. औरंगाबादमधील एमआरए लॉजीस्टिक कंपनीच्या मालकाने कामगाराला मारहाण केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

‘काम का देत नाही?’ असं विचारायला गेलेल्या कामगाराला मालकाने मारहाण केल्याचा आरोप होत आहे. राजू फकिरचंद हिरेकर असं मारहाण झालेल्या कामगाराचे नाव आहे, तर मुकेश शरावत असं मारहाण करणाऱ्या कंपनी मालकाचे नाव आहे. मारहाण प्रकरणी कामगाराने औरंगाबादमधील वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पाहा व्हिडीओ :

राम भोगलेंच्या कंपनीत गुंडगिरी

दरम्यान, औरंगाबाद शहरातील औद्याोगिक वसाहतींमध्ये दादागिरीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. गेल्याच आठवड्यात औरंगाबाद शहरातील प्रसिद्ध उद्योजक राम भोगले यांच्या भोगले ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये दहा ते पंधरा गुंडांनी प्रवेश केला होता. त्यानंतर कंपनीचे सीईओ असलेल्या नित्यानंद भोगले यांना मारहाण केली होती. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला होता.

काय घडलं होतं?

आमच्या कारखान्यातील एका कामगाराने डायल्युटेड सोप वाटर प्यायलं होतं. त्यानंतर आम्ही त्या कामगाराला रुग्णालयात भरती केलं, मात्र त्यानंतर आलेल्या 10 ते 15 जणांच्या टोळक्याने आमच्या कंपनीचे सीईओ नित्यानंद भोगले यांना मारहाण केली. यानंतर पोलीस येतायत म्हटल्यानंतर या सगळ्यांनी पळ काढला पण असे प्रकार सातत्याने आणि उद्योगात सर्वत्र घडत आहेत. त्यामुळे उद्योजकांनी व्यवसाय कसा करायचा, असा प्रश्न उपस्थित होत असल्याचं राम भोगले या प्रकारानंतर म्हणाले होते.

संबंधित बातम्या :

CCTV VIDEO | औरंगाबादेत गुंडगिरी, उद्योजक राम भोगलेंच्या कंपनीत घुसून 10 ते 15 जणांची CEO ना मारहाण

VIDEO : वाळू माफियांची गुंडगिरी, भर बाजारात पत्रकारावर भीषण हल्ला, हल्ल्याचा थरार कॅमेऱ्यात कैद

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.